(समीर खान)
जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट यांनी उद्घाटन केलें तर माजी मंत्री डॉ रणजित पाटील यांच्या हस्ते झाले बक्षिस वितरण
अकोला. कॅरम या खेळाचा प्रचार व प्रसार करण्याच्य दृष्टीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीड़ा परिषद व जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय कॅरम क्रीडास्पर्धा सन २०२३-२४ च्यां १४,१७, आणि १९ वर्षाखालील मुले व मुली स्वतंत्रपणे आयोजन दि.१० ते १२ ऑक्टॉंबर २०२३ या कालावधित एल.आर.टी कॉमर्स कॉलेज सभागृह रतनलाल प्लॉट अकोला येथे करण्यात आले. या विभागीय शालेय कैरम स्पर्धेचे उद्घाटन आज बी जी ई सोसायटीचे कार्यकारी सदस्य डॉ अमित हेडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा अधिकारी सतीषचंद्र भट यांनी केले आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ऑल इंडिया कॅरम असोसिएशन चे उपाध्यक्ष प्रभजीत सिंह बछेर , चीमा इंडस्ट्रीजचे संचालक करण चिमा आणि अकोला, बुलडाणा फोटोग्राफर असोसिएशननरेंद्र नायसे हे होते. आजच्या विजेत्यांना माजी मंत्री डॉ . रणजीत पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी बी जी ई सोसायटी चे ऍड. मोतीसिंह मोहता,बी जी ई सोसायटी चे सचिव पवन माहेश्वरी,बी जी ई सोसायटीचे क्रीडा शिक्षक प्रा. अजय पालडीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज प्रारंभ झालेल्या १४ वर्षे खालील स्पर्धा साठी अमरावती विभागातील ४२ मुलेव ४२मुली स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात ४० मुल व ३८मुली स्पर्धकांनी हजेरी लावली होती. आजच्या १४वर्षे खालील स्पर्धामध्ये मुलांमध्ये दर्शन राठोड यवतमाळ हा प्रथम विजेता ठरला तर कार्तिक जाधव यवतमाळ हा व्दितीय ठरला. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी नैमेश पळसपगार याने पटकावला आहे. याप्रमाणेच मुली स्पर्धकांमध्ये अर्पिता करवते अकोला मनपाही पहिली ठरली तर सोनम गवई बुलडाणा ही द्वितीय आणि मयुरी ठोंमरे ही तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.ईतर विजेत्यांमध्ये मुलांमध्ये अर्णव पाटील, प्रथमेश पाटील, श्रीप्रसाद सोनटक्के तसेच विजेत्या मुलीमध्ये श्वेता विजय चव्हाण, रीतिका जाधव, पायल पाचोडे यांचा समावेश आहे. संध्याकाळी बक्षीस वितरण सोहळा संपनन झाला असुन माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे समन्वयक तनिवर अहमद खान, मुख्य पंच तौकिर उल्ला खान, साहाय्यक पंच किरण पारडे , शेख मेहबूब, समिर जहांगीरदार, मंगेश धुरंधर, सूरज धुरंधर, सूरज गायकवाड, समीर अहमद , सलोणी जामनिक, नैना खंडारे , चिम्मा इंडस्ट्रीज चे प्रतिनिधी अजय गवई यांनी परिश्रम घेतले.
या क्रीडा स्पर्धाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विदर्भ कॅरम असोसिएशन आणि अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनीचेही अयोजन करण्यात आले आहे. या विभागीय शालेय कॅरम स्पर्धेची उत्कृष्ट फोटोग्राफी करणाऱ्या विजेत्या फोटोग्राफर साठी प्रथम पारितोषिक ३००० रूपये, द्वितीय पारितोषिक २००० रूपये व तृतीय पारितोषिक १०००, रूपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपये चे दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एलआरटी कॉमर्स कॉलेज सभागृह, रतनलाल प्लॉट, अकोला येथे १०, ११ व १२ ऑक्टोम्बर २०२३ रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत होणाऱ्या कॅरम स्पर्धेची फोटोग्राफी करून दिनांक १४ ऑक्टोम्बर पर्यन्त ८x१२ या साईज मध्ये फ़ोटो प्रिंट जमा करायची आहे तरी जास्तीत जास्त फोटोग्राफर बंधुनी सहभाग घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून प्रत्येकी ३ फ़ोटो स्विकारण्यऻत येतील प्रदर्शनीचे स्थळ – कॅरम हॉल, मुखर्जी बंगल्या जवळ, राउतवाड़ी अकोला येथे १७ व १८ ऑक्टोम्बर रोजी सकाळी ११ ते ५वाजेपर्यंत प्रदर्शनी असणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी व विदर्भ कॅरम असो. आणि अकोला, बुलडाणा फोटोग्राफर असो यांनी केले आहे.तांत्रीक सहाय्य व पंच उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी विदर्भ कॅरम असोसिएशन कडे सोपविण्यात आली आहे.
आज दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी १७ वर्षे खालील मुल, मुलींच्या स्पर्धा होणारं आहेत. तर उद्या १९वर्षे खालील मुल, मुलींच्या स्पर्धा होऊन या तिन्ही दिवसांच्या स्पर्धांचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.