अकोला (वार्ताहर) मौलाना अबुल हसन अली मियाँ नदवी इस्लामिक अकादमी कर्नाटक मार्फत घेण्यात आलेल्या इस्लामियत परीक्षेत हाजी नगर अकोट येथील मिल्लत उर्दू मिडल, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी
मिल्लत संस्थेचे सचिव सरफराज नवाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय यश मिळविले.
यावेळी प्रथम क्रमांक मिळविलेल्या अकरा विद्यार्थ्यांना सुवर्ण चे नाणी देऊन गौरविण्यात आले. मिडल स्कूलमधून अबुसुफियान शेख आझाद, अल्मीरा तजमीन नजीर खान, मसिरा खानम वसीम उल्ला खान, माहीन सदफ अब्दुल रहमान, रोशनी अकरम शाह, नगीन मुहम्मद सईद कुरेशी, अश्मीरा हसन आणि हायस्कूलमधून मंताशाह साहेर मुहम्मद मुजीबुल हक, खुजीमा अरीब खान, मुबश्शीर खान. अल फैज खान अमजद खान, मुसैफ कुरेशी शेख ख्वाजा यांना पुरस्कार देण्यात आले.तसेच 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि 31 विद्यार्थ्यांना रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद सदस्य गोपी किशन बाजोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मिल्लत स्कूलचे सीईओ सरफराज नवाज खान, माजी मु.अ.. अजीज खान पठाण, हाजी युनूस खान, एजाज खान, मौलाना मुहम्मद अनीस, शरीफ कुरेशी, प्राचार्य मोहम्मद मुबीनुर रहमान, अमोल भाऊ, चेतन भाऊ, विक्की भाऊ, मोहसीन शेख, यास्मिन बानो, नूरजहाँ, आदी मान्यवर उपस्थित होते.
कुराण पठणाने कार्यक्रमाचा आरंभ झाला.प्रास्ताविकात
सरफराज नवाज खान यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट व ध्येयावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात गोपी किशन बाजोरिया यांनी मिल्लतच्या या उपक्रमाचे कौतुक करून सांगितले की, आजच्या युगात शालेय शिक्षणासोबतच इस्लामिक आणि नैतिक शिक्षणही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक नेमत अली यांनी व आभार प्रदर्शन इशतियाक हुसैन यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.