आशा कर्मचारी मोबदल्यात वाढ ७०००, भाऊबीज बोनस २००० देण्या बाबत आमदार रणधीर सावरकर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व अर्थमंत्री यांना फोन व निवेदन प्रत पाठविन्याचे आश्वासन..!

दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून आशा कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याकरिता अशा कर्मचारी संपावर आहेत आज आठव्या दिवशी एक आनंदाची बातमी मिळालेली आहे की आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट रु. २००० दिवाळीपूर्वी देण्यात येणार., २. आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात रु. ७००० ची वाढ देण्याचा, ३. गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात रु. १०००० ची वाढ देण्याचा, प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलेला आहे म्हणून आता सर्व आशा कर्मचाऱ्यांचे २४ जानेवारी च्या मंत्रिमंडळ झालीच नाही म्हणून आमदार रणधीर सावरकर यांच्या निवास स्थानी आशा कर्मचारी सकाळीं ८.३० वा. भेटून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव आयुक्त यांना फोन करुन व निवेदन पाठवून मागण्या पुर्ण करण्याचा आग्रह धरला त्यावर आमदार साहेब यांनी आश्वासन दिले फोन व्दारे कळविण्यात येईल सदर भेट आंदोलन कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व शेकडो आशा कर्मचारी यांनी केले कॉ. नयन गायकवाड , कॉ. मायावती बोरकर, छाया वारके, सविता प्रधान, शालू नाईक, कॉ. आरती बोबडे, कॉ. निर्मलाताई लव्हाळे, कॉ. संध्याताई गायकवाड, कॉ उषाताई इंगळे, कॉ. शोभाताई डोईफोडे, कॉ. मिनाक्षी कारले, कॉ. अल्का उन्हाळे, कॉ. पदमा गोळे, कॉ. शीतल दंदी, कॉ. सुवर्णा धानोकार, कॉ. उषा अहीर, कॉ. सुमित्रा. वानखडे, कॉ. प्रिती नायसे, कॉ. दिपा निमजे, कॉ. तब्बसुम, कॉ. रेखा. बनकर, कॉ. ज्योती नवले, कॉ. आम्रपाली भालेराव, कॉ. सुवर्णा चवरे, कॉ. शबाना कालुवाले, कॉ. रितु घ्यारे शह शेकडो आशा कर्मचारी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW