
दिनांक २७.०८.२०२५ पासुन जिल्हयात सर्वत्र श्री गणेश उत्सवाला सुरवात झाली असून ईद ए मिलाद पण लवकरच असणार त्या अनुषंगाने संपुर्ण अकोला जिल्हयात उत्सव कालावधी शांतता व सुव्यवस्थेच्या वातावरणात साजरा होण्यासाठी मा.श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद संबंधाने सर्व उपाययोजना व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

आज दि.०२/०९/२०२५ रोजी सायंकाळी १७/०० वा ते १९/३० वा मुर्तिजापुर विभागाची नगर परिषद सांस्कृतीक हॉल येथे मा. पोलीस अधीक्षक सा. यांच्या मार्गदर्शना आली मा. आमदार श्री. हरीष अप्पा पिंपळे, उपविभागीय अधिकारी श्री. संदिप कुमार अपार सा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे मॅडम, तहसिलदार श्रीमती वैशाली बोबडे मॅडम, यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये व शांतता समिती सदस्य, गणपती मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. त्यानंतर कार्यकामाचे प्रारतावीक सपोनि अनिल पवार यांनी केले. उपविभागीय अधिकारी श्री. संदिप कुमार अपार सा यांनी गणेश उत्सव संबंधाने सरकारी योजना तसेच नियोजन बाबत माहिती दिली.
मा. पोलीस अधीक्षक यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सागीतले की या वर्षी सरकार तर्फे गणेशउत्सवाला राज्य महोत्सवात्ता दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी तसेच मंडळांनी आनंदमय वातावरणा मध्ये उत्सव साजरा करावा. त्यासाठी अकोला पोलीस दला तर्फे पुर्ण तयारी झाली असुन तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सण उत्सव काळात कायदा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे ठामपणे आपले मत मांडले सोबतच सामाजीक व जातीय सलोखा तसेत पांरपारीक तसेच सामाजीक उपक्रम राबविणा-या मंडळांना अकोला पोलीस दला तर्फे बक्षीस देण्यात येणार आहे याबाबत माहीती देवुन त्यामध्ये जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
मा.आ.श्री हरिषआप्पा पिंगळे यांनी आपले मनोगतात मंडळांना पारंपारीक वादयांचा वापर करून आपली संस्कृती चे दर्शन घडवावे तसेच मुस्लीम बांधवांचा ईद मिलाद उत्सवाच्या संबंधाने माहिती दिली. जातीय सलोख्याने सर्व राण, उत्सव साजरे करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे मॅडम यांनी केले.
आगामी गणपती उत्सव व ईद-ए-मिलाद चे पार्शभुमीवर उपविभाग मुर्तिजापुरचे वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये गणेश उत्सव मंडळ यांना सण उत्सव शांततेत पार पाडावा या बाबत मार्गदर्शन सुचना करण्यात आल्या सदर कार्यक्रमाला मुर्तिजापुर शहर चे ठाणेदार पो.नि. श्री. अजित जाधव सा. मुर्तिजापुर ग्रामीण वे ठाणेदार श्री. श्रीधर गुटटे सा. माना चे ठाणेदार श्री. गणेश नावकर, पिंजर चे ठाणेदार श्री. गंगाधर दराडे सा, बोरगाव मंजू चे ठाणेदार श्री अनिल गोपाल सा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री पटरीया सा, म.रा.वि.वि.कं.चे उपकार्यकारी अभियंता श्री अभय कदम तसेच ईतर सर्व ३०० ते ३५० गणपती मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील, मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हजर होते. कार्यकमाचे सुत्रसंचालन सपोनि अनिल पवार यांनी केले.
