
विजेतेपद तसेच ५ सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशा १८ पदक पटकावीले.
अमरावती येथे दि १९ ते दि २१.०८.२०२५ दरम्यान २० व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे अमरावती येथे आयोजन करण्यात आले होते. आज मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथजी पोकळे, पोलीस आयुक्त अमरावती शहर श्री अरविंद चावरीया, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री विशाल आनंद, पोलीस अधीक्षक अकोला मा. श्री अर्तित चांडक यांचे प्रमुख उपस्थीती मध्ये बक्षीस वितरण सोहळा अमरावती येथील पोलीस वसाहत येथे आज रोजी संपन्न झाला.
अकोला पोलीस दलातील पोलीस अधीक्षक अकोला मा. पोलीस अधिक्षक श्री अर्चित चांडक सा. यांचे मार्गदर्शनाखाली श्री पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या नेतृत्वात १९ सदस्यांची टीम तयार करण्यात आली होती. सदर टीम मधील पोलीस अधीकारी व अंमलदारांनी तपास स्पर्धेला वैज्ञानिक मदत या विषयाला अनुसरून, फॉरेन्सीक सायन्स, फींगरप्रिंट, काईम इन्वेस्टीगेशन, कोर्ट जजमेंट टेस्ट, लेबलिंग अॅण्ड पॅकींग, पोलीस पोट्रेट टेस्ट, काईम फोटोग्राफी, अॅन्टी राबोडेट चेंकीग, कॉम्पुटर अवेअरनेस, डॉग स्कॉड कॉम्पीटीशन इत्यादी स्पर्धेमध्ये पोलीस दलाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच विविध स्पर्धामध्ये एकूण ५ सुवर्ण (गोल्ड), ७ रौप्य (सिल्वर) आणि ६ कांस्य (ब्रोन्झ) पदके पटकावत उत्तम प्रदर्शन केले.
केलेल्या उत्कृष्ट कामगीरी बददल पोलीस अधीक्षक यांनी सर्व टीमचे कौतुक करज सर्वाना शुभेछा दिल्या. अकोला पोलीस दलातील अधिकाऱ्यांची मेहनत आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण याचे फळ मिळाल्याचे सांगितले जात आहे. या विजयामुळे अकोला पोलीस दलाची कामगिरी इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.