पारदर्शक, सुलभ व कागदपत्र विरहित पध्दतीने पीक कर्ज मंजुरी

अकोला, दि. 19 : जनसमर्थ पोर्टलव्दारे शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) / पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहिमे या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील शेतक-यांना तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार व पीएमबी अलायन्स यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केलेला आहे. भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने अॅग्रीस्टॅक डेटा प्रणालीचे जनसमर्थ पोर्टलशी एकात्मिकीकरण पात्र शेतक-यांना पारदर्शक, सुलभ व कागदपत्र विरहित पध्दतीने पीक कर्ज मंजुरी करता येणार आहे.

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी विशेष केसीसी / पीक कर्ज मोहिम दि. ३१ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पिककर्जाची मंजुरी जलद, पारदर्शक आणि कागदविरहित पध्दतीने मिळावी, यासाठी जन समर्थ पोर्टलचा वापर सुरु झाला आहे. या उपक्रमामुळे बँकाच्या फेऱ्या टाळून घरबसल्या कर्ज मंजुरीची सोय होणार आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) आणि पीएसबी अलायन्स यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमांतर्गत अॅग्रीस्टॅक डेटा थेट जन समर्थ पोर्टलशी जोडण्यात आले आहे. ज्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुलभ आणि कागदविरहित होणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नितीन घोरे तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या योजनेकरिता शेतकऱ्यांनी पुढील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.

आधार क्रमांक मोबाईल क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. शेतकरी बॅग्रीस्टैंक रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत असावी. सध्या ही सुविधा केवळस्वतःच्या नावावर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध आहे.

जनसमर्थ पोर्टलद्वारे KCC मिळविण्यासाठीची प्रक्रिया :

फार्म रजिस्ट्रीमध्ये नोंदणी तपासणे. (आधार क्रमांक/नोंदणी आयडी आवश्यक) https://www.jansamarth.in/home या संकेतस्थळावर मोबाईल नंबर वापरून अर्ज करा. ॲग्री लोन किसान क्रेडीट कार्ड निवडा आणि केसीसीसाठी पात्रता तपासा. राज्य व जिल्हा निवडा. माहिती वाचून संमती द्या आणि पुढे जा. आधार क्रमांक प्रविष्ट करा व ई-केवायसी तपशील तपासा. ओळख पडताळणी, बँक खाते तपशील, वैयक्तिक तपशील, आर्थिक तपशील, जमीन व इतर तपशील, अर्ज पुनरावलोकन, बँक निवड. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी बँकेचे निकषानुसार कर्जवाटपाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्‍हा उपनिबंधक डॉ. प्रविण एच लोखंडे यांनी केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW