शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तोच कुणाचा उद्धार करू शकेल=मो.रफीक सिद्दीकी

फातेमा खिदमत फाउंडेशन च्या वतीने शिलाई मशीन, मजदूर सामग्री, पोशाख व वितरित 10 व 12 च्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


अकोला:-फातेमा खिदमत फाउंडेशन दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे चांगले उपक्रम राबवीत असते. हाजी हाजी मोहम्मद जाफर सिद्दीकी शाळा क्र. 9 खदान येथे फातेमा खिदमत फाउंडेशन च्या वतीने 10 व 12 च्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिलाई मशीनच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम “तीलावते कुराण” वाचून सुरुवात करण्यात आली

कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मो. रफिक सिद्दिकी व मार्गदर्शक चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी, एहसान दानिश खान साजिद शेख सर होते. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती हाजी फारूक साहब गुजरात, मुफ्ती अजवत अहमद गुजरात उपस्थित होते.

सत्कारमूर्ती यांचे स्वागत व सत्कार अकोला महानगरपालिकेचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मोहम्मद रफीक सिद्धी साहेब यांनी केला हाजी अय्युब साहब हर साल गरीब लोगो कि मदत करते हे फातेमा खिदमत फाउंडेशन ने उनका भव्य सत्कार केला.

आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील मेमोंटो प्रमाणपत्र देऊन मोहम्मद रफीक सिद्दिकी यांनी केला व शिलाई मशीन मजदूर सामग्री, पोशाख वितरित करण्यात आले व मार्गदर्शन करताना सांगितलेली की शिक्षण ही एक महत्त्वाची बाब आहे शिक्षणाने विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या आई वडिलांचा व स्वतःचा उद्धार करू शकतो समाजामध्ये एक चांगले प्रतिबिंब उमटु शकते त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुला मुलींना शिक्षण द्या कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो शिकेल तोच उद्धार करू शकेल .

यावेळी खदान परिसरातील शाळा व कॉलेज हेड मास्टर रो चा सन्मान चिन्ह देऊनहाजी मो जाफर सिद्दीकी HM माझ्हार सर, मंशा उर रहमान शाळा चे HM अर्शद इकबाल, जिल्हा परिषद उर्दू शाळा चे HM एजास सर, हाजी जाफार सिद्दीकी जुनिअर कॉलजे तौसिफ़ सर, खदान येथील कोचिंग संचालक रईस सर, फिरोज सर यांना सन्मान चिन्ह देण्यात आले.


कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संग्राम दादा गावंडे, मेहबूब चौधरी, जमील खान, इस्माईल बडगुजर, अलीम ठेकेदार, रियाज अली, मकसूद सैय्यद जाफर, ताज अली, मुस्तफा पहेलवान, शेख जाफर डॉ. इजहार रशीद कादरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन फातिमा खिदमत फाउंडेशनचे मन्नान सिद्दिकी वसीम ठेकेदार शोयब भैय्या राणा, युनूस ठेकेदार तबराक शहा, मुजीब शेख यांनी केले. कार्यक्रमाला यावेळी जावेद ठेकेदार, सलमान भाई, हमिदजी, अनीस सम्राट, आशीक अली, मोहसिन खत्री, इकबाल खत्री,हनीफ चव्हाण,मो.इकबाल तवर, मौलाना अय्याज साहेब,कय्युम कपुर,मगबुल आगवान, रिहासु पहेलवान, सैय्यद बब्बु, नजीर ठेकेदार,गुलाम जावेद, आर जी ग्रुप,आझाद ग्रुप, प्रिन्स ग्रुप, यांच्यासह पालक वर्ग व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW