
अकोला, दि.११ – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी १.२० वाजताच्या सुमारास शिवनी विमानतळावर आगमन झाले.यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यांचे समवेत खा.अनुप धोत्रे,आ.डॉ. संजय कुटे,आ.श्वेता महाले आदी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि
प मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी,पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय,उपविभागीय अधिकारी शरद जावळे,तसेच अन्य विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.