बाळापूर : आगामी काळातील सण-उत्सव तसेच श्रावण महिन्यात काढण्यात येणाऱ्या कावड यात्रा शांततेत पार पडावी म्हणून बुधवार दि.३१ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाळापूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या नेतृत्वात बाळापूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. आगामी काळातील सण उत्सव त्याचं प्रमाणे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी बाळापूर शहरातील महादेव भक्त कावडधारी मंडळातील सदस्य वेळवेगळ्या तीर्थक्षेत्रावरून पाणी आणून महादेवाला जलाभिषेक करतात.

दरम्यान बाळापूर शहरातून काढण्यात येणाऱ्या कावड मंडळांनी शांततेत कावड यात्रा काढून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन बाळापूर पोलिसांनी या शांतता समितीच्या कावड काढणाऱ्या मंडळाना केले. यासह शांतता समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहरातील वाहतूक कोंडीकडे पोलिसांनी लक्ष देऊन वाहतुकीला वळण लावावे अशीही विनंती केली. तसेच शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आप आपले विचार मांडले.

शांतता समितीच्या या बैठकीला शांतता समितीचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कावड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची उपस्थिती होती.