मदन भरगड यांची मागणी, आंदोलनाचा इशारा
अकोला दि 31 : राज राजेश्वर सेतूची उंची कमी असल्याने जलस्तर थोडा जरी वाढला तरी हा पूल पाण्याखाली जातो. आज बुधवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी चार वर्षाचा चिमुकला आपल्या वडिलांसोबत मोटरसायकल ने पुलावरून जात असताना मोरणा नदीच्या पाण्यात वाहून गेला. नदीला कठडे असते तर जीव वाचला असता.
जय बोके असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. शिवसेना वसाहतीतील हा मुलगा रहिवासी असल्याचे समजते. जुन्या शहरातील तसेच हरिहर पेठ भागातील हजारो लोकांचे दररोज या पुलावरून वर्दळ असते. अशा परिस्थितीत एवढ्या महत्त्वाच्या पुलावर साधे लोखंडी कठडे सुद्धा बसविण्यात आले नाही यावर मा. महापौर मदन भरगड चिड व्यक्त केली आहे. राजेश्वर सेतूवर तत्काळ कठडे बसवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भरगड यांनी दिला आहे.
एक तर राजेश्वर सेतू निर्मिती करताना गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. या ठिकाणी मोठ्या मुलाच्या उंची एवढा पूल तयार करण्यात यावा, अशी ही मागणी त्यांनी केली आहे.