अकोला प्रतिनिधि: इरशाद अहमद
श्रावण महिन्यास दिनांक ०५.०८.२०२४ पासुन सुरुवात होणार असल्याने अकोला जिल्हयातील आगामी कावड उत्सव पुर्व तयारीच्या अनुषगांने मा. श्री बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या अध्यक्षतेखाली कावड व पालखी उत्सव मंडळातील सदस्यांसोबत समन्वय साधने करीता आज दिनांक ३०.०७.२०२४ रोजी दुपारी ०५.०० वा पोलीस लॉन येथे समन्चये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला शहराला कावड यात्राची ८० वर्षाची पंरपरा लाभली आहे, अकोल्याचे ग्राम दैवत राजराजेश्वरला गांधीग्राम येथुन कावड आणुन जलाभिषेक करण्यात येतो. हा उत्सव मोठ्या हर्षउल्लासाने भाविक भक्त पार पाडतात तसेच जिल्हयातील व तालुक्याचे ठिकाणी सुध्दा कावड पालखी उत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षी श्रावण महिना दिनांक ०५.०८.२०२४ ते ०२.०९.२०२४ पावेतो असणार असल्याने पाच श्रावण सोमवार असणार आहेत अकोट येथे चौथ्या सोमवारी कावड यात्राची मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार असुन अकोला शहरामध्ये दिनांक ०२.०९. २०२४ ला पाचवा श्रावण सोमवार कावड पालखी उत्सव अकोला मध्ये असणार आहे. त्या अनुषंगाने अकोला शहरातील तसेच जिल्हयातील कावड शिवभक्त मंडळ यांच्या उपस्थितीत कावड मंडाळातील सदस्यांनी आपल्या समस्या मांडल्या व त्या विषयावर चर्चा करून समन्वय साधुन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सकारत्मक चर्चा केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या करीता मा. अपर पोलीस अधीक्षक, अभय डोंगरे यांनी मंडळांना काही महत्वाच्या सुचना दिल्या तसेच पोलीस अधीक्षक यांनी सर्व समस्या चे निराकरन करत पोलीस विभागाकडुन सर्वतोपरी कायदेशीर सहकार्य लाभेल असे आश्वासीत केले.

या वेळी सार्वजनीक कावड पालखी उत्सव समीती अध्यक्ष राजेश भारती, शहर अध्यक्ष पप्पु मोरवाल, तसेच राज राजेश्वर संस्थान चे चंद्रकात सावजी तसेच जिल्हयातील सर्व कावड पालखी मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. तसेच सहा. पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी दाभाडे तसेच शहरातील व जिल्हयातील ठाणेदार यांची उपस्थिती होती.