
अकोला शहरातील midc पोलीस स्टेशन हद्दीतील वखार महामंडळाच्या गोदाम मधून सोयाबीन चे कट्टे लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसानी दोन आरोपींना अटक केली आहे.
अकोला midc परिसरातील वखार महामंडळाच्या गोदाम चे शटर वाकवून चोरट्यांनी 49 कट्टे सोयाबीन लंपास केल्याची घटना 2 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसानी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या जवळून एक लाख एकतीस हजार रुपये किमतीचे सोयाबीन जप्त केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शेख फैजान शेख जामीन राहणार फिरदोस कॉलनी व इम्रान खान अयाज खान राहणार नया बैदपुरा अकोला यांना अटक केली आहे, अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालय समोर हरज करण्यात येणार असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन midc चे ठाणेदार राहुल जंजाळ यांनी व कर्मचाऱ्यांनी केली.