
उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुदर्शन पाटील साहेब, शहर विभाग अकोला यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गनोज बहुरे यांनी शहर वाहतुक नियंत्रण शाखा येथे शहरातील ऑटो युनिय अध्यक्ष व ५५ ऑटो चालक यांना प्रवासी वाहतुक करीत असतांना घ्यावयाधी काळजीबाबत समुपदेशन केले.
समुपदेशनात ऑटो रिक्षा चालक यांनी रिक्षा चालवितांना गणवेश परीधान करणे, विना परमिट ऑटो न चालविणे, बॅच सोबत बाळगणे, बेशिस्त ऑटो रस्त्यावर उभे न करणे ऑटो पार्कीग दिलेल्या ठिकणी आपले ऑटो पार्क करणे, ऑटो चालवितांना रस्त्यावर प्रवासी चढ उतार न करणे तसेच ग्रामीण परमीट धारक ऑटो शहरात प्रवेश न करणे याबाबत सुचना दिल्या. तसेच मुळ ऑटो मालक यांनी आपले ऑटो भाडयाने चालविण्या करीता देतांना नशा करणारे व्यक्ती किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्तींना आपला ऑटो देवु नये. तसेच रात्रीच्या वेळी ऑटो मधुन कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीस वाव देणार नाही याबाबत दक्षता घ्यावी व वाहतुक नियमांचे उल्लंघन करू नये अशा सुचना दिल्या.
वरील दिलेल्या सुचनेप्रमाणे जो कोणी ऑटो चालक सुचनांचे पालन करणार नाही त्यांचेविरुध्द प्रादेशीक परिवहन विभाग, अकोला व शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडुन दिनांक १८/०९/२०२५ रोजी पासुन संयुक्त विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
तरी वाहतुक शाखे मार्फत आवाहन करण्यात येत आहे की, ऑटो चालवितांना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे, परवान्या पेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करू नये व वाहतुक नियमांचे तंतोतंत पालन करावे व आपले वाहनावर पेंडीग दंड ठेवु नये असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावे.