
कार्यान्वित- गुन्हे तपासात होणार मदत
आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी, मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. सदर व्हॅन ही भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 अंतर्गत कार्यान्वित करण्यात आली असून, गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारी ही विशेष सेवा ठरणार आहे.

प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती येथून पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला करिता वाहन क्रमांक एम एच 12 वाय डी 9968 ही फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली आहे. सदर व्हॅन सुरुवातीला उपविभागीय अधिकारी, अकोला यांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित असणार असुन इतर वाहने प्राप्त होईपर्यंत ही सेवा संपूर्ण जिल्ह्यासाठी (अकोला शहर व ग्रामीण) उपलब्ध राहील. यासोबतच आवश्यक किट्स, रसायने व इतर वैज्ञानिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून, फॉरेन्सिक तज्ञ, वैज्ञानिक सहाय्यक, वाहन चालक व प्रयोगशाळा परिचर यांची नियुक्ती करण्यात आली आहे
फॉरेन्सिक व्हॅन मूळे पोलीस दलाला गुन्हे तपासा संबंधाने विशेष मदत होणार आहें, घटनास्थळी त्वरित पोहचून पुरावे सुरक्षितपणे गोळा करता येतील, भौतिक पुरावे सुरक्षित करून शास्त्रीय पद्धतीने संरक्षित केले जातील, त्यामुळे तपासाला मदत होईल, इतर जैविक नमुने मुदतीत घेऊन तात्काळ लॅब ला पाठवविण्यास मदत होईल.. घटनास्थळाची फोटोग्राफी आणि सीन-मॅपिंग करून नोंद व्यवस्थित होईल. प्राथमिक केमिकल व ट्रेस अनॅलिसिसमुळे तात्काळ उपयुक्त माहिती मिळेल, पुराव्यांचे चेन-ऑफ-कस्टडी कायम ठेवण्यास मदत होते., विशेषज्ञ तंत्रज्ञ आपल्या उपकरणांसह घटनास्थळी काम करू शकतात., तपासाच्या निकालासाठी आवश्यक तांत्रिक अहवाल लवकर तयार करता येतात. कोर्टात सादर करण्यायोग्य विश्वसनीय आणि भौतिक पुरावे यामुळे लवकर सादर करता येतील त्यामुळे आरोपीला शिक्षा देणे शक्य होईल. गुन्हे सिद्धिचे प्रमाण वाढविण्यास मदत होईल.
या टीम मध्ये श्री. अभिषेक मा. भारसाकळे सहायक रासायनिक विश्लेषक, श्रीमती पूजा खडसे सहायक रासायनिक विश्लेषक श्रीमती नेहा इंगळे सहायक रासायनिक विश्लेषक, श्रीमती सोनल वि. गाडगे वैज्ञानिक सहायक, श्रीमती गायत्री हरणे वैज्ञानिक सहायक, श्री. नागेश बावने वैज्ञानिक सहायक, श्री. ओम बोडफळे वैज्ञानिक सहायक, श्री. राहुल ग. गावंडे वाहन चालक श्री. अनिकेत पु. वाजडे, वाहन चालक श्री. अंकुश मोरे प्रयोगशाळा परिचर, श्री. रूपेंद्र वि. ठाकरे प्रयोगशाळा परिचर, हे टीम मध्ये असणार आहेत. मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून पोलीस विभागाला तपासासाठी त्वरित वैज्ञानिक मदत मिळून गुन्हे उकलण्याच्या प्रक्रियेत गती आणि अचूकता वाढणार आहे. सदर कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधीकारी अकोला विभाग श्री. सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा, श्री सुरेश परसोडे सपोनि फिंगर प्रिन्ट, यांची उपस्थिती होती.