ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट फाईल अकोला परीसरातील जुगार खेळणा-या आरोपीवर अकोट फाईल पोलीसांची कारवाई १,०४,२०० रू चे माला सह १२ आरोपी ताब्यात’

दि.१३/०९/२०२५ रोजी पो.स्टे. ला गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, महेबुबनगर, नायगाव, अकोट फाईल येथे मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी बसुन काही ईसम ५२ ताश पत्याचा हारतजितचा जुगारचा खेळ खेळत आहे. अशा खात्रीलायक बातमीची माहीती पो. नि. श्री. रहीम शेख यांना देवुन त्यांचे मार्गदर्शना खाली पोस्टॉफ पोहवा /१५०० प्रशांत इंगळे, पोहवा/२११४ हर्षल श्रीवास पो. कॉ./२३५७ गिरीश तिडके, पोका / २१५५ ईमरान शाह, पोका /२१५२ अमिर शेख असे महेबुब नगर अंकोट फाईल अकोला येथे जावुन आरोपी नामे १) फिरोज कालु पप्पुवाले वय ३२ वर्ष. रा. फरीदनगर नायगाव, अकोट फाईल अकोला, २) सैयद सिकंदर सैयद कुरशीद वय २६ वर्ष रा. महेबुबनगर, अकोट फाइल अकोला (३) आफताब लाल मुन्नीवाले वय २४ वर्ष रा. शाहनवाझपुरा नायगाव, अकोट फाईल अकोला, ४) सोहेल महेबुब गोरखे वय १९ वर्ष रा. फरीदनगर नायगाव, अकोट फाईल अकोला, ५) मोहम्मद शब्बीर मोहम्मद नईम वय २४ वर्ष रा. नायगाव इदगाहजवळ, अकोट फाईल अकोला, ६) शेख नदीम शेख नजीर वय ३० वर्ष रा. संजयनगर, नायगाव, अकोट फाईल अकोला, ७) शाहरूख युसूफ कामनवाले वय २५ वर्ष रा. शाहनवाझपुरा नायगाव, अकोट फाईल अकोला, ८) चांद छोटु चौधरी वय ३७ रा.शाहनवाझपुरा नायगाव, अकोट फाईल अकोला, ९) शेख शमशेर शेख मेहबुब वय ३२ वर्ष रा.. फरीदनगर, नायगाव, अकोट फाईल अकोला, १०) शेख मजहर शेख शौकत वय २२ वर्ष रा. ओकापुर रोड नायगाव, अकोट फाईल अकोला, ११) विशाल गजानन वाघमारे वय २४ वर्ष रा. शाहनवाझपुरा नायगाव, अकोट फाईल अकोला, १२) शेख फैजल शेख नासीर वय २८ वर्ष रा. मिलननगर, नायगाव, अकोट फाईल अकोला यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन विविध कंपनीचे ०७ मोबाईल ज्यांची अंदाजे किंमत ९४००० रूपये व जुगारातील नगदी १०,२०० रूपये असा एकुण १,०४,२०० रूपयाचा मुददेमाल जप्त करून गुन्हे नोंद करून कार्यवाही करण्यात आली आहे.

मा. पोलीस अधिक्षक सा अकोला यांचे “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत पो स्टे अकोट फाईल अकोला येथे जुगार अडयांवर तसेच दारू विक्री करणारे ईसमांवर, दारू पिउन धिंगाणे करणारे व्यक्तिवर, तडीपार ईसमांवर, फरार आरोपीतांवर सतत कार्यवाही सुरू असुन अवैधधंदे करणारे आरोपींचे समुळ नष्ट करण्याचे काम या मोहीमे अंतर्गत सुरू आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक/श्री अर्चित चांडकं साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक / बदेली रेड्डी साहेब, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी/सुदर्शन पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / शेख रहीम, सपोनि जनार्धन खंडेराव, पो हवा/१५०० प्रशांत इंगळे, पो हवा / २११४ हर्षल श्रीवास, पोका /२१५५ ईमरान शाह, पोका / २३५७ गिरीश तिडके, पोका /२१५२ अमिर शेख यांनी केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW