
अकोला, दि. ७ : मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक दि. ५ सप्टेंबरऐवजी दि. ९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला असून अकोला शहरातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दि. ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची मिरवणूक ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणूक तसेच दि. ६ सप्टेंबर रोजी श्री गणेश उत्सव मिरवणूक मागेपुढे असल्याने समाजात एकता अखंडता असावी याकरिता मुस्लीम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणूक दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याअनुषंगाने सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद चा उत्सव साजरा करणे सोयीचे होईल, याकरिता दि. ९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टीचा आदेश होणेस जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विनंती केली आहे.
दि. २ ऑगस्ट २०१९ नुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रकान्वये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशाद्वारे दि. ०९ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला शहरातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात येत आहे.
०००
