
110 प्राध्यापक,क्रीडा प्रशिक्षक,क्रीडा शिक्षक, महिला क्रीडा शिक्षक,क्रीडा संघटक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार.
अकोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या द्वारा स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 29 ऑगस्ट 2025रोजी सकाळी मा. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते क्रीडा रॅली काढण्यात आली होती.
यावेळी मा. आमदार रणधीर सावरकर (मुख्य प्रतोद- मंत्री दर्जा ) मा. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना उपस्थित होते.त्यांचदिवशी राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दिनांक 30 ऑगस्ट 2025 सकाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तसेच संध्याकाळच्या सत्रात क्रीडा विषयक चर्चा सत्रे ठेवण्यात आले होते.दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सायकल रॅली काढण्यात आली होती व संध्याकाळी समारोपीय कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
अध्यक्ष म्हणून मा. आमदार साजिद खान पठाण होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर मालोकर, ऑल इंडिया कॅरम फेडरेशन चे सचिव प्रभजीतसिंग बच्छेर,प्रा. प्रदीप थोरात, श्री.बुडन गाडेकर, प्रा. नरेंद्र बुजरूक, प्रा. राजेश चंद्रवंशी, प्रा. राजेंद्र अलसेट, प्रा. बाळूभाऊ आगासे हे होते. त्याचप्रमाणे हॉकीचे वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू श्री. गुरुमीतसिंग गोसल व वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी खेळाडू माजी उपायुक्त श्री. संजय बैस व जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीशचंद्र भट्ट उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संघटक राजेश गावंडे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथीनी उपस्थितांना स्व.मेजर ध्यानचंद यांच्या जीवनपर माहिती दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वयोवृद्ध खेळाडूंचा शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नॅशनल गेम्स मध्ये बॉक्सिंग खेळात तृतीय क्रमांक प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू हरिवंश टावरी यांना महाराष्ट्र शासनाकडून रोख तीन लाख रु बक्षीस मिळाले. त्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच ज्यांनी अकोला शहराला संबधित खेळामध्ये राज्यपातळीवर, देशपातळीवर चमकवले अशा सर्व प्रशिक्षकांचा, क्रीडा शिक्षकांचा, महिला क्रीडा शिक्षकांचा,क्रीडा संघटकांचा, पंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अकोला जिल्ह्यातील जवळपास 110खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा संघटक उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, क्रीडा अधिकारी डॉ. अभिजित फिरके,जिल्हा संघटक राजेश गावंडे, क्रीडा मार्गदर्शक सुरजकुमार दुबे, क्रीडा मार्गदर्शक डॉ.नलिनी जाधव, कनिष्ठ लिपिक अमित दातकर, निशांत वानखडे, अजिंक्य धेवढे, राधाकिसन ठोसरे, राजू उगवेकर, गजानन चाटसे, अशोक वाठोरे, रवी खंडारे, अनिल ढेंगाळे यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीश्चंद्र भट्ट कळवितात.