
१,१६,९५५/- रूपये चा माल जप्त
मा. पोलीस अधिक्षक साहेब, अकोला यांचे आदेशाने प्रहार ऑपरेशन अंतर्गत दिनांक ३१/०८/२०२५ रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून जुगार रेड बाबत माहिती मा. पो. नि. सा. यांना देवुन त्यांचे आदेशाने पंच व पो. स्टाफ सह अनिकट, अकोला येथे जावुन पाहणी केली असता एकुण ११ ईसम हे तिन पानी जुगार खेळतांना दिसुन आले वरून आम्ही पकडलेल्या ईसमांना पंचासमक्ष त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांव १) गणेश विश्वनाथ टाकसाळकर वय ५८ रा. हनुमान आखाडा, अनिकट, अकोला २) दिलीप रामसिंग बघेल वय ५२ रा. हनुमान आखाडा, अनिकट, अकोला ३) वैभव गोपालअप्पा मिटकरी वय ३५ रा. खोलेश्वर, अकोला ४) संजय लक्ष्मण नावडकर वय ५१ रा. गायगाव, अकोला ५) ओम प्रकाश चंपालाल अग्रवाल वय ६९ रा. राजपुत पुरा, अकोला ६) शामकुमार मुंगीलाल लोहीया वय ४६ रा. ग्यानेश्वर नगर, डाबकी रोड, अकोला ७) संजय नारायण रत्नपारखी वय ५४ रा. अनिकट, ‘अकोल ८) संतोषसिंग प्रतापसिंग कावळ वय ५२ रा. अनिकट, अकोला ९) नितीन लादुभाउ लोडाया वय ६१ रा. काळामारोती, जुने शहर, अकोला १०) रनजित बलदेव गायकवाड वय ४२ रा. हरीहर पेठ, अकोला ११) महेश बाबुलाल अग्रवाल वय ५७ रा. जवाहर नगर, अकोला तसेच त्याचे कडुन १) ५२ ताशपत्ते २) ०९ वेगवेगळया कंपनिचे मोबाईल किं. अं. १,०६,५००/- ३) नगदी १०,४५५/- रूपये असा एकुण १,१६,९५५/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन येथे लेखी रिपोर्ट देवुन अपराध क्रमांक २५३/२०२५ कलम ४,५ महाराष्ट्र जुगार अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक बि. चंद्रकांत रेड्डी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतिश कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, येथील पोलीस निरीक्षक संजय गवई साहेब यांचे आदेशाने गुन्हे शोध पथक चे पोउपनि अनिल इंगोले कर्मचारी सपोउपनि महेंद्र बहादुरकर, पोहेकॉ अजय भटकर, पोहेकॉ ख्वाजा शेख, पोकॉ निलेश बुंदे, मपोकॉ करीष्मा चव्हान यांनी प्रत्यक्ष कारवाई पार पाडली आहे.