
दिनांक 31.08.2025 रोजी श्री. अर्चित चांडक पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या संकल्पनेतून, “नशा विरुद्ध रंगाची लढाई” या अर्थपूर्ण घोषवाक्याने अकोला जिल्ह्यातील शाळा-विद्यालयातील परिसर रंगून गेला. अकोला पोलीस मिशन उडान आणि युवा विचारपीठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “नशामुक्त भारत” या संकल्पनेवर आधारित भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नशाविरोधातील आवाज बुलंद केला. छोट्या मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी रंगरेषांतून व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचे वास्तव मांडत त्यातून मुक्त होणाऱ्या सशक्त भारताची सुंदर झलक साकारली.

विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांतून “व्यसन हा विनाशाचा मार्ग आहे”, “नशा सोडा जीवन जिंका”, “आरोग्यदायी भारत -नशामुक्त भारत” असे ठोस संदेश उमटले. या उपक्रमातून बालकांच्या निरागस कल्पनाशक्तीला सामाजिक भानाची जोड मिळाल्याचे पाहायला मिळाले.
“विद्यार्थ्यांची ही सर्जनशीलता समाजासाठी प्रेरणादायी आहे. रंग आणि रेषांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला नशामुक्तीचा संदेश नक्कीच जनमानसात पोहोचेल,” असे आयोजकांनी सांगितले.

श्री अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या मिशन उडान संकल्पनेवर आधारित नशे विरुद्ध रंगाची लढाई भव्य रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन बहारदार करण्यात आले या दरम्यान श्री गणेश जुमनाके आर पी आय पोलीस अकोला, आर एस आय गुलाब पाटनकर, श्री गोपाल मुकुंदे समन्व्यक, मिशन उडान अकोला, श्री हरिचंद्र इटकर मनपा शिक्षणाधिकारी, डॉ सागर थोटे, श्री. गोपाल सुरे केंद्रप्रमुख, श्री समिरजी थोडगे, सहमंत्री, विद्याभारती विदर्भ, श्री रामेश्वरदादा बरगट राष्ट्रधर्म युवा मंच, श्री कमलकिशोरजी हरितवाल, श्री संदीप शेवलकर जिल्हाध्यक्ष कलध्यापक संघ अकोला, श्री संजय आगाशे, प्रा निलेश ढाकरे अध्यक्ष युवा विचारपीठ प्रतिष्ठान अकोला, श्री राजेश अग्रवाल मुख्य समन्व्यक, श्री कौशिक पाठक कार्यकारी समन्व्यक, ऍड. शेषराव गव्हाळे, प्रा गणेश पोटे, डॉ नितीन देशमुख, श्री गिरीधर भोंडे, श्री नाजूकराव डांगे, श्री संजय चव्हाण, श्री गोपाल राऊत, सौ. स्मिता अग्रवाल उपाध्यक्षा, युवा विचारपीठ, समन्वयिका सौं कोमल चिमणकर, सौं अश्विनी ढोरे, सौं सपना गव्हाळे, सौं पल्लवी पाठक, सौं रिमा ढाकरे, तसेच अकोला आयडॉल मधील गायक यांनी आपल्या गीतांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले.

पालक, शिक्षक, नागरिक यांनीही या उपक्रमाचे मोठ्या शब्दांत कौतुक केले. नशामुक्त भारताच्या दिशेने हे एक पाऊल ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्पर्धे मध्ये गट अ-1-राजेश्वर कॉन्व्हेंट 6वी नंदिनी गावंडे, 2 सान्वी विखे प्रभात किड्स, 3-जिजाऊ कन्या समीक्षा पाटील, प्रोत्साहन पर माही नारायाने राजेश्वर कॉन्व्हेंट, आदित्य चावके, ब गट 1-प्रीती काकडे न्यू इंगलीश स्कूल 2 अर्पिता आगरकर खंडेलवाल स्कूल, 3 तिसरा हंसिका पेढीवालप्रोत्साहन परसेठ बन्सीधर तेल्हारा, हर्षल विनोद वाघमारे, कृतिका गोपाल मांडेकर अनुष्का महल्ले कारमेल यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन मान्यवारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.