घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या वतीने पोर्टलची निर्मिती

आपल्या बाप्पांचे फोटो अपलोड करण्याचे व दर्शन करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

मुंबई, २९ ऑगस्ट
महाराष्ट्रातील गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्योत्सवांतर्गत घरोघरीच्या बाप्पांचे व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करणे, प्रसिद्ध मंडळे व मंदिरातील गणपतींचे थेट दर्शन मिळावे याकरिता पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.

या पोर्टलवर आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पांचे व सार्वजनिक मंडळातील बाप्पांचे छायाचित्र अपलोड करू शकता. तसेच, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे व सार्वजनिक मंडळातील बाप्पांचे थेट दर्शन घेण्याची सोय देखील या पोर्टलद्वारे करण्यात आली आहे. या संधीचा लाभ अधिकाधिक गणेशभक्तांनी घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW