
” ऑपरेशन प्रहार ” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीत घरगुती गॅस सिलेंडर चा अवैध वापर करणारे 02 आरोपी अटक गॅस सिलेंडर व इतर साहित्य असा एकूण 64 हजाराचा मुद्देमाल जप्त.
मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.
आज दि. 27/08/2025 रोजी आम्ही पथकासह स्था. गु. शा. कार्यालय मध्ये हजर असताना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली कि, पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील पातूर रोडवर दिल्ली दरबार हॉटेलच्या बाजूला बंद पडलेल्या सर्व्हिसिंग सेंटर जवळ घरगुती वापरातील गॅस सिलेंडर अवैध रित्या ऑटोमध्ये भरला जात आहे अशा माहितीवरून रेड केली असता घटनास्थळावर आरोपी नामे 1) राजू उर्फ शफिख खान जमील खान वय 32 वर्ष, रा. खीडकीपुरा जयहिंद चौक अकोला 2) रिझवान अहमद मकसूद पटेल वय 26 वर्ष, रा. अंबिकानगर वाशिम बायपास अकोला हे अवैधरित्या ऑटो मध्ये गॅस भरताना मिळून आले घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर 1) HP गॅस सिलेंडरचे घरगुती वापराचे 17 रिकामे सिलेंडर किंमत अं. 8500/- रू. 2) HP गॅस सिलेंडरचे घरगुती वापराचे 21 भरलेले सिलेंडर कि. अं. 31500/- रु असे एकूण 38 सिलेंडर मिळून आले 3) गॅस भरण्याकरता वापरलेली 02 Gold Power कंपनीची मशीन, 4) 02 इलेक्ट्रॉनिक वजन काटा अं. कि. 4000/- रु. असा एकूण 64,000/-* रु. चा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला. सदर आरोपी विरुद्ध पो स्टे. जुने शहर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चीत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी साहेब, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली API गोपाल ढोले, अंमलदार HC / खुशाल नेमाडे, HC/ फिरोज खान, HC / मेहेंद्र मालिये, PC/ राज चंदेल, Pc / अभिषेक पाठक, GPSI विनोद ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.