
मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.
बार्शीटाकळी हद्दीतील ग्राम तिवसा बु येथे आज दि.27/08/2025 रोजी पंचांसमक्ष्य रेड केली असता, आरोपी नामे लक्ष्मन काशीराम घासले वय 74 वर्ष रा. तिवसा बु ता. बार्शीटाकळी, जि. अकोला याचे कबज्यात अवैधरित्या सडवा मोहमाचं 255 लिटर एकूण अं 38,250/-रुपये व 05 लिटर दारु असा एकूण 39.250/-रुपये चा मुद्देमाल नाश करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पो स्टे बार्शीटाकळी येथे कलम 65 ई, दारु बंदी कायज्ञान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
तसेच ग्राम तिवसा बु येथीलआरोपी नामे धनसिंग अमरसिंग राठोड वय 73 वर्ष रा. तिवसा बु ता. बार्शीटाकळी, जि. अकोला याचे कबज्यात अवैधरित्या 45 लिटर दारु असा एकूण 9000/-रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध पो स्टे बार्शीटाकळी येथे कलम 65 ई, दारु बंदी कायज्ञान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दोन्ही गुन्ह्यात आरोपी कडून गावठी दारु व मोहमाच एकूण 305 लिटर एकूण कीं 48,250/- रुपये मुद्देमाल नाश करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चीत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे साहेब, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी गोपाल जाधव, GPSI दशरथ बोरकर, HC गोकुळ चव्हाण, PC अन्सार, PC स्वप्नील, व चालक पो का मनीष ठाकरे यांनी केली.