“ऑपरेशन प्रहार अंतर्गत पो.स्टे. डाबकी रोड पोलीसांनी रेड कारवाई करुन २ तलवारी व ३ फरसा नावाचे धारदार शस्त्र केले जप्त “

मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.

दिनांक २६/०८/२०२५ रोजी वेळ १७/४५ या मरतर्फे फिर्यादी एएसआय दिपक तायडे हे पो स्टे ला हजर असतांना गुप्तबातमीदार यांचे कडुन माहिती मिळाली की इसम नामे अजीज खान उर्फ राजा युनुस खान रा. शाहबाबु शाळेजवळ, भगतवाडी सैलानी नगर, डाबकी रोड अकोला याने त्याचे राहते घरामध्ये अवैधरित्या व विनापरवाना लोखंडी तलवारी तसेच फरसा धारदार शस्त्र विकी करीता ठेवलेले आहेत.

अशा खात्रीलायक बातमीवरुन वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्राप्त माहितीप्रमाणे पो स्टॉफ व दोन पंचासह जावुन अजीज खान उर्फ राजा याची त्याचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे घरामध्ये एका रुममध्ये सोफयाचे मागे खाली एका पोतडयामध्ये काहितरी संशयास्पद स्त्यिा गुंडाळलेले मिळून आले वरुन घरी हजर इसम अजीज खान उर्फ राजा यास ते काढून पोतडे खोलुन त्याची पाहणी केली असता त्यामध्ये २ धारदार लोखंडी तलवारी व ३ फरसा नावाचे धारदार लोखंडी शस्त्र असे एकूण ५ शस्त्र कि.अं. ६१००/रु चे मिळून आल्याने ते आरोपी याचे कडुन पंचासमक्ष जप्त करण्यात आले. आरोपी इसम याचे सदरचे कृत्य कलम ४,२५ आर्म ऍक्ट प्रमाणे होत असल्याने पो स्टे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतिश कुलकर्णी साहेब, ठाणेदार अभिषेक अंधारे पो.स्टे. डाबकी रोड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अनिल चव्हाण सोबत पो. स्टॉफ एएसआय दिपक तायडे, एएसआय सुनिल टोपकर, एएसआय फईम शेख, पोहेकॉ संतोष उपाध्याय, पोहेकों प्रविण इंगळे, पोहेकों नापोकॉ राजेश ठाकूर, पोकों मंगेश गिते मपोशि आश्विनी माने सर्व पो.स्टे. डाबकी रोड अकोला यांनी केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW