
अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे त्याकरीता मा. पोलीस अधिक्षक श्री अर्चित चांडक यांनी जिल्ह्यात आकस्मीक नाकाबंदी चे आयोजन करून सार्वजनीक ठिकाणी दारू पिणाऱ्या इसमांवर कडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

सदर नाकाबंदी दरम्यान पोलिस विभागाच्या वतीने दिनांक २३.८.२०२५ चे २०.०० वा ते २४.०० पावेतो आकस्मीक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच विशेष पथके तयार करून सार्वजनीक ठिकाणी दारू पिउन, गोंधळ घालणे, शांतता भंग करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५६ इसमांवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. तसेच संपुर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबवुन, नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकुण २४ नाकाबंदी पॉईंट वर ५९२ वाहने चेक करून मोटार वाहन कायदयान्वये १३५ कारवाई करून ६८,७५०/-रू वा दंड आकरण्यात आला आहे, महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अनव्ये ०१ केस करण्यात आल्या आहे. नाकाबंदी दरम्यान सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी दिल्या तसेच सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांनी नाकाबंदी मध्ये सक्रीय सहभाग घेवुन प्रभावी नाकबंदी करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांपासून नागरीकांनी दूर राहावे, आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अकोला पोलिसांकडून अशा प्रकारचे विविध प्रतिबंधक उपयोजना अधिक तीव्रतेने राबवुन, कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. करीता सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि शहराच्या शांततेत योगदान द्यावे व नागरिकांच्या सहकाऱ्यानेच शहरात शांतता व सुव्यवस्था राखली जाऊ शकते, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी केले आहे.