
अकोला: शहरातील सुधीर कॉलनी परिसरात घरफोडी करून सुवर्ण आभूषणे, मंगळसूत्र चोरणारा अट्टल चोरट्याला सिव्हिल लाईन्स पोलिसांनी जळगाव येथून गजाआड केले. या कारवाईत सुवर्ण आभूषणांसह एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी श्याम काशी प्रसाद पसारी 51 रा. सुधीर कॉलनी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून प्रवेश केला असता घरातील सुवर्ण आभूषणे लंपास केले.
याप्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करून तपासात घेण्यात आला. यामध्ये गुन्हे शोध पथक व पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक तपास करत आरोपीला जळगाव येथून गजाआड केले.
गिरीश सहदेवराव शोगोकार 46 रा. गायत्री नगर, तेल्हारा जि. अकोला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी सुवर्ण आभूषणांसह एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिनेश पवार, पोलीस कर्मचारी शक्ती कांबळे, प्रदीप पवार, पवन सिरसाट, उमेश यादव, अक्षय तायडे, चालक राजू गावंडे, गोपाल ठोंबरे, सानप यांनी केली.
