
“ऑपरेशन प्रहार ” अंतर्गत पोलीस स्टेशन पातुर येथे अवैध गावठी दारू हातभट्टीच्या वर रेड करून एकूण 66 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल नाश
मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.
आज दि. 22/08/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्तबातमीवरून शासकीय वाहनाने पो स्टे. पातूर हद्दीतील ग्राम शेकापूर येथील शेकापूर नाला येथे पंचासमक्ष चालू गावठी हातभट्टी दारू रेड केली असता, आरोपी नामे 1) सहदेव मोतीराम जाधव, वय 40 वर्ष, 2) बाळू पुंडलिक मेटांगे, वय 42 वर्ष दोन्ही रा. आलेगाव ता. पातूर जि अकोला हे गावठी हातभट्टी दारू गळताना मिळून आला त्याचे ताब्यातून गावठी दारू 100 लिटर प्रति लिटर 200/- रु. प्रमाणे 20,000/- रू व 31 लोखंडी पिप्यामध्ये 465 लिटर मोहा सळवा प्रति लिटर 100/- रू प्रमाणे किंमत 46500/-रु असा एकूण 66,500/- रू चा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करून जागेवर नाश करण्यात आला यातील अक्षय कापकर रा आलेगाव हा मालक असून फरार झाला आहे. तरी सदर आरोपी विरुद्ध पो स्टे. पातूर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित साहेब चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी साहेब, पोलीस निरीक्षक अधिकारी श्री शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनात API गोपाल ढोले, HC/अब्दुल मजीद, HC/ महेंद्र मालिये, HC/ रवी खंडारे, PC / अशोक सोनोने, HC / प्रशांत कमलाकर स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.