- जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक
अकोला, दि. २० : दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर करण्यासाठी जयपूर फूट उपयुक्त असून, त्याचे गरजूंना विनामूल्य वितरण हे मोठे सेवाकार्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी आज येथे केले.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी व लॉयन्स क्लब ऑफ पुणे सुप्रिम यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त जयपूर फूट विनामूल्य वितरण महाशिबिर आयोजित करण्यात आले, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

रामेश्वर मणियार, रजनी अंबादे, नितीन धोत्रे, संस्थेचे चेअरमन डॉ. किशोर मालोकार, प्रकाश गवळी, अविनाश बेलोकार, प्रभजितसिंह बछेर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनीही शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
समाजहितासाठी सेवेची प्रक्रिया सातत्यपूर्ण असणे गरजेचे असते. त्यामुळे सर्वांनी सेवाकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. चांडक यांनी यावेळी केले.

मनोज चांडक यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सुभाषसिंह ठाकूर यांनी आभार मानले. संदीप पुंडकर, ॲड. सुभाष मुंगी, ॲड. महेंद्र साहू, प्रशांत राठी, संदेश चांडक, कपिल रावदेव, राजू बुडुकले, राममहरी डांगे, अमर गौड, डॉ. गजानन वाघोडे, पंकज राठी आदी उपस्थित होते.