अकोला पत्रकार हल्लाप्रकरणी लोकस्वातंत्र्यचे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन.

धमक्यांच्या तक्रारीवरच योग्य वेळी कडक कारवाई करण्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अभिवचन

अकोला – अकोला येथील दैनिक सुफ्फा वृत्तपत्राचे संपादक हाजी सज्जाद  हुसेन व त्यांच्या मुलांवर कोयते आणि ईतर प्राणघातक शस्त्रांनी हल्ले करण्याची गंभीर घटना  गेल्या शनिवारी घडली.स्थानिक ईराणी वसाहतीमधून अवैध धंदे करणाऱ्या तेथील गुलाम अली औलद हुसेन आणि आकोट फाईलमधील अंबादास उर्फसोनु रोहिदास थोरात या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या तडीपार कारवाईची पोलिस प्रेस नोटनुसारची बातमी प्रकाशित केली म्हणून संतापातून हा हल्ला केला.लोकशाहीचे रक्षण आणि संविधान संवर्धनासाठी आपल्या समाजशील पत्रकारीतेतून योगदान पत्रकारांवर हल्ले होण्याच्या अशा घटना अत्यंत गंभीर आहेत.त्यामुळे  यातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांना निवेदन देऊन २० मिनीटे चर्चा करण्यात आली.लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख(निंबेकर)यांचेसोबत, उपाध्यक्ष प्रदिप खाडे,पुष्पराज गावंडे,सौ.जया भारती,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर ,सागर लोडम,यांचेसह व राष्ट्रीय आणि जिल्हा कार्यकारीणीचे  ४० पत्रकार पदाधिकारी यावेळी उपस्थित होते‌.

      याप्रसंगी पत्रकार संभाव्य हल्ले प्रकरणातील घटनाक्रमांवर व यासंबंधीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.गुन्हेगार प्रवृत्तींकडून अगोदर धमक्या दिल्या जातात ही त्यांची हल्ल्यापूर्वी पत्रकारांना अजमावण्याची सुरूवात असते. त्या तक्रारीवर पोलिस कारवाया होत नाहीत.त्याच संधीचा फायदा घेऊन पत्रकारांवर हल्ले होतात.म्हणून पोलिसांनी वेळीच दक्षता घेण्याची गरज असल्याची अपेक्षा अध्यक्ष संजय देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.पोलिस आणि पत्रकार हे समाजासाठीच काम करतात.म्हणून त्यांना संरक्षण आणि प्रतिबंधात्मक म्हणून कारवाई म्हणून धमक्यांच्या तक्रारी वेळीच कराव्यात त्याची अगोदरच गंभीर दखल घेतली जाईल असे आश्वासन पोलिस अधिक्षकांनी यावेळी दिले.

        याप्रसंगी पोलिस अधिक्षक कक्षामध्ये संजय एम. देशमुख,व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह  विभागीय संघटक संतोष धरमकर,विजय बाहकर, मनोहर मोहोड,संजय कृ.देशमुख,दिलीप नवले,औरंगजेब हुसेन (सुफ्फा)अर्जून घुगे,बुढन गाडेकर,अनिल मावळे,नरेद्र देशमुख,सौ.दिपाली बाहेकर,संघपाल शिरसाट,दिपक शिरसाट,रमेश समुद्रे,राजेश वानखडे,संतोष मोरे, अॕड.एम.एस.इंगळे, योगेश शिरसाट,एजाज अहमद खान,राजेश वानखडे, प्रकाश जंजाळ,मिलींद शिरसाट,दिपक गवई, मो.जुनेद नूर,फुलचंद वानखडे,रमेश खडसे,गणेश कुरई,चॉंद रिझवी,गुलाम मोहसिन,समीर खान,रमेश खडसे,व अनेक पत्रकार उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW