
दि २७/०७/२०२५ चे दुपारी ०३.०० वा ते रात्री ११.०० वा दरम्यान अभिनोददीन महेमुदुल हसन वय ४५ वर्ष रा शादाब नगर, जिलानी मस्जिद जवळ, अकोट फाईल हे परीवारासह कामानिमित्त घराबाहेर गेले होते तर अज्ञात चोरटयाने घरात घुसुन ६,००,०००/- रू रोख व १० ग्रॅम सोन्याचे बिस्किट असा एकुण ६,७०,०००/- रू चा मुददेमाल चोरून नेला अशा तक्रारी वरून पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला येथे गुन्हा क्रमांक ३६९/२५ कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री शेख रहीम यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शन प्राप्त करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तात्काळ घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाचा समांतर तपास करून पोलीस उप निरीक्षक शेख अख्तर पो स्टे चे गुन्हे प्रकटीकरणाचे एएसआय / १३८१ अनिस पठाण, पो हवा /१५०० प्रशांत इंगळे, पो हवा / २२२ योगेश काटकर, पो हवा / ५५२ संतोष चिंचोळकर, पो हवा / २११४ हर्षल श्रीवास, पोका /२१५५ ईमरान शाह, पोका / २३५७ गिरीश तिडके, पोका /२१५२ अभिर यांचे वेगवेगळे पथक तयार त्यांना मार्गदर्शन करून तसेच सुचना देवुन आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत, तांत्रिक तसेच बौध्दीक कौशल्याचा वापर करून आरोपीचा कसोशीने शोथ घेवुन आरोपी नामे खिबर उर रहमान मोबिन उर रहमान वय १९ वर्ष रा शादाब नगर, अकोट फाईल अकोला याने चोरी केल्याची माहीती मिळाल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरची घरफोडी केल्याची कबुली दिल्याने आरोपीस पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला येथे अटक करून पी.सी.आर. घेण्यात आला आहे व आरोपीकडुन दोन मोबाईल, गुन्हयातील सोने व रोख रक्कम असा एकुण ५,०२,००४ रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पो उप नि शेख अख्तर हे करीत आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक/श्री अर्चित चांडक साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक / रेडडी साहेब, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी/सतिश कुळकर्णी सा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / शेख रहीम, पो उप नि शेख अख्तर, एएसआय / १३८१ अनिस पठाण, पो हवा /१५०० प्रशांत इंगळे, पो हवा / २२२ योगेश काटकर, पो हवा /५५२ संतोष चिंचोळकर, पो हवा /२११४ हर्षल श्रीवास, पोका /२१५५ ईमरान शाह, पोका / २३५७ गिरीश तिडके, पोका /२१५२ अमिर, पोका /१५५४ ओम बैनवाड यांनी केली.