पाच घरे जाळून खाक : आ. साजिद खान यांची घटनास्थळी तात्काळ धाव
अकोला : विजय नगर येथील बजरंग चौक भागात गॅस सिलिंडरचा विस्फोट झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत तब्बल पाच घरे जळून खाक झाली. सदर घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी घटनास्थळ गाठत नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेत प्रशासनाशी समन्वय साधत उचित मदत करण्याची मागणी केली.
शहरातील विजय नगर परिसरात सोमवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत स्थानिक रहिवासी असलेले संजय ढवळे, रवी गायकवाड, निंबाबाई निंबे, अक्षय अरुलकर, राजेश घामोडे यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच अग्निशामक विभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जीवन आवश्यक वस्तू या आगीत जळून खाक झाले.
यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्या नुकसानाची माहिती जाणून घेत जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधत नुकसान ग्रस्त परीवारांना लवकरात लवकर शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी केली. तर यावेळी सदर पाचही कुटबियांच्या घराची राख रांगोळी झाल्याने त्यांना तात्पुरते स्वरूपात राहण्यासाठी शेजारीच मनपाच्या वतीने बांधण्यात आलेले सभागृह खुले करून देत तेथे राहण्याची त्यांची व्यवस्था यावेळी आ. पठाण यांनी करून दिली. यावेळी साजिद खान यांच्यासमवेत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.