हकीकत अशा प्रकारे आहे की, दि. 02/01. /2021 रात्री अंदाजे सव्वा आठ वाजताचे दरम्यान शिवणी कडुन अशोक वाटिका कडे नेहरू पार्क चौकाकडुन जाणारा ट्रक क्रमाक MH 30-AB-4000 चे ट्रक चालकाने त्याचा ट्रक भरधाव वेगाने व निष्कॉळजी पणे चालवुन नेहरू पार्क चौकातुन पायी जाणा-या इसमास गंभीर जखमी करून निघून गेला होता. जखमी झालेल्या इसमास डोक्याला मार लागुन मेंदु व रक्त बाहर प़डले त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशा रिपोर्टवर पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन्स अकोला येथे भा दं वि. चे कलम 279 and 304(A) सह वाचा 184 मोटार वाहन कायदा अंतर्त गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास विलास शंकरराव दुतोंडे यानी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने एकुण चार साक्षीदार तपासले. साक्षीदारांची आरोपीच्या वकीलांनी उलटतपासणी मध्ये तफावत व उणीवा विद्यमान न्यायालया समक्ष आणुन दिल्या व सरकार पक्ष आरोपी विरूध्द संशया पलीकडे दोष सिध्द करू शकले नाही, म्हणुन तिसरे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी श्री. ए. जे. गिरे साहेब यांनी आरोपी आमिर खान सरदार खान यांची निर्दोष मुक्तता केले.
आरोपीच्या वतीने अँड. अहमद रजा खान यांनी व अँड. सादात अली देशमुख, अँड. मोहम्मद मुदस्सीर आणि अँड. आमिर खान.