अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी तपासण्यांचे प्रमाण वाढवा, जिल्हाधिकारी अजित कुंभार

जिल्हा नार्को- कोऑर्डिनेशन समितीची बैठक

अकोला, दि. 18 : जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, लागवड आदींना कठोरपणे प्रतिबंध घालावा, आचारसंहिता कालावधीत असे कुठेही निदर्शनास आले तर कडक कारवाई करा. तपासणी व कारवायांचे प्रमाण वाढवा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

अकोला जिल्हा नार्को- कोऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक आज जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस, अन्न व औषध प्रशासन, कृषी आदी विविध विभागांचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, अंमली पदार्थाची वाहतूक-विक्री संपूर्णतया रोखण्यासाठी शोध मोहिम, कारवायांचे प्रमाण वाढवावे. औषध विक्रेत्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा अनिवार्य आहे. 2 हजार 400 औषधालयांपैकी 2 हजार 200 आस्थापनांत सीसीटीव्ही लावण्यात आल्याची नोंद आहे.

उर्वरित दुकानांतही ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही व्हावी. रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्म व इतर वाहनांचीही यंत्रणेकडून तपासणी व्हावी. शाळा परिसरात तंबाखूजन्य अंमली पदार्थांचे विक्री, सेवन होऊ नये, डाक खात्याकडून संशयित पार्सलची तपासणी व्हावी, असेही आदेश जिल्हाधिका-यांनी दिले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW