सकाळी अपघात झाला याची माहिती वलाई येथील शेतकऱ्यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ समृद्धी महामार्ग लोकेशन 108 पायलट विधाता चव्हाण डॉक्टर गणेश यांना अपघाताची माहिती दिली.त्यांनी तात्काळ घटना घटनास्थळी रवाना झाले. व सास आपत्कालीनचे रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक दीपक सोनोने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी रवाना.
अपघात खूप भयानक असल्यामुळे सदरचालक हा कारमध्ये अडकला होता. समृद्धी महामार्ग अग्निशामक दल यांनी अथक प्रयत्न करून कार मध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढले त्यावेळी समृद्धी महामार्ग एस एस पी पोलीस तर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक या टीम प्रामुख्याने घटनास्थळी हजर होत्या.
मृत्यू झालेल्या चालकाचे नाव बळीराम ग्यानबा पिसे वय 24 रा शिवनी (पिसा ) तालुका लोणार जिल्हा बुलढाणा