सक्षम उपक्रमाच्या माध्यमातून अकोला पोलीस पोहचले २१६ शाळांपर्यंत आणि केले २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना केले समूपदेशन तसेच मार्गदर्शन….

अकोला पोलीस दला विविध जनजागृती पर उपक्रम राबविण्यात येत असतात, दामिनी, जननी, चिलीमार विरोधी पयक, बालक जनजागृती सप्ताह, परंतु मा. श्री बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला यांनी अकोला जिल्हावा पदभार संभाळल्या पासून सक्षम विदयार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाय योजना जनजागृती अभियान पुर्ण जिल्हाभर सुरू केले आहे. दामिनी पथकाचा विस्तार करून दामिनी मार्शल सुरु करण्यात आल्या, त्यामध्ये विधार्थी संवाद साठी शाळा भेटी उपक्रम सुरु करण्यात आला, बालकांची वैयक्तिक सुरक्षितता आणि खबरदारी घेण्याच्या उद्देशाने माय बॉडी, माय रोपटी या वाक्याला घेऊन मुलांना सुरक्षीतेचे धडे देवुन त्यांना सजग करण्यासाठी व्हीडीओ, माहिती पत्रक, तसेच मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करून मुलां मधली भीती कमी करून कायदेविषयक बाबी सांगुन त्यांना कायदयाप्रती साक्षर करण्याचा मुख्य उद्देश या अभियानाचा आहे. या उपक्रमा अंतर्गत आता पर्यन्त २१६ शाळावर कार्यशाळा घेण्यात असुन २० हजार पेक्षा विध्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले आहे.

याचाच एक भाग म्हणून आज विध्यार्थी व पोलीस संवाद सत्र वे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यलय येथे करण्यात आले होते, काही दिवसांपूर्वी सक्षम उपक्रम अंतर्गत ग्राम राजंदा या ठिकाणी कार्यशाळा चे आयोजन केले होते, शाळे मध्ये नवदुर्गा उत्सवाच्या निमित्याने जागर अभ्यासाचा हा कार्यक्रम मध्ये विविध विषयावर मुलांच्या गुणांना वाव भेटावा यासाठी सुंदर नियोजन केले होते, त्यानुसार झालेल्या कार्यक्रम वर शाळेतर्फे निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये निवड झालेल्या ८ विध्यार्थी नामे १. सृष्टी राहुल केदार २. अनुराधा मनोज पोधाडे ३. रिया संतोष सोनोने ४. भक्ती अरुण गुंडे ५. आनंदी श्यामकु‌मार पांडव ६.लब्धी सतिष बरगूडे ७. ऋतूजा उमेश कुराळे ८. जिवीका नंदकिशोर पांडव यांना मा पोलीस अधीक्षक यांचे हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. तसेच सक्षम उपक्रमामध्ये सहभाग घेतल्या बद्दल पोलीस अधीक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री कैलास केदार तसेच शिक्षक श्री. संतोष इंगळे, गणेश रावस्कर, संतोष बोबडे, सुशिला कांबळे, उर्मीला जवंजाळ मनिषा हिवरकर यांना स्मृती विन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यलय भेटी दरम्यान मुला मध्ये वेगळा उत्साह होता, पोलीस अधीक्षक कार्यलयाची प्रशस्त इमारत पाहून मुलांना आनंद झाला त्यानंतर गेट मधील अशोक स्तंभासमोर फोटो काढण्यावा मोह आवरता आला नाही. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयामधील आयकर युनिट, सायबर युनिट, डायल ११२, पोलीस कंट्रोल रूम येथील वायरलेस, द्वारे कसे संदेश दळणवळण चालते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, आपत्कालीन मदत क्रमांक ११२ ला कॉल केल्यानंतर कशाप्रकारे पोलिसांची मदत केली जाते हे प्रात्यक्षिक करूण विद्यार्थीना समजून सांगण्यात आले. त्याबबरोबर पोलीस अधीक्षक कार्यालय येथील पोलीस अधीक्षक सरांचे ऑफिरा, त्याचबरोबर विजय हॉल येथे मुलांना व्हिडिओद्वारे माहिती देण्यात आली.

त्यानंतर पोलीस अधीक्षक सरांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला मुलांनी सुद्धा प्रतिसाद देत प्रश्न उत्तराच्या माध्यमातून शंका निरसन करण्यात आले अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून पोलीस व विद्यार्थी यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होते असे मत माननीय पोलीस अधीक्षक सरांनी व्यक्त केले मा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः विध्यार्थी सोबत संवाद साधून मार्गदर्शन केले आहे. यापुढे युध्दा हा उपक्रम सुरू राहणार आहे यामध्ये आपण सुदधा सहभागी होवु शंकता हा उपक्रम बीलंका पर्यन्त सिमीत न करता सर्व जनते मध्ये कायदयाप्रति जागृती निर्माण करणे हा आहे, यासाठी सर्व शाळा, कॉलेज, व्यतिरिक्त एनजीओ, सामाजिक संघटना यांच्या सहकार्यातून सक्षम अभियान अजुन प्रभावी पणे राबविण्याचा मानरा पोलीस अधीक्षक यांचा आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW