“किराणा मार्केट येथून ०४ लाख रूपयाची बॅग लिफ्टींग करणाऱ्या अटल चोरट्यास, पिंपरी चिंचवड पुणे येथून स्थानीक गुन्हे शाखाने केले जेरबंद. अकोला जिल्हयातील चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस २,४०,०००/रू वा मुद्देमाल हस्तगत.
दिनांक १२/०२/२४ रोजी फिर्यादी नामे शुभम संजय बेहरे वय २८ वर्ष रा. ग्राम धुसर ता+जि. अकोला यांनी रिपोर्ट दिला होता की, ते त्यांचे किराणा दुकाणाचे सामन खरेदी करण्या करीता नवीन किराणा मार्केट जुने शहर अकोला या ठिकाणी त्यांची टाटा एस गाडी घेवून गेले असता, गाडी मध्ये किराणा सामान भरत असता त्यांचे ४,००,०००/-रू ने भरलेली बॅग गाडीचे डावे बाजुला लटकवलेली होती ती पैश्याने भरलेली बॅग ही दोन अनोळखी ईसमांनी माझी पैश्याने भरलेली बॅग काढून गाडीवर माझे समोर पळूण घेवून गेले. अश्या रिपोर्ट वरून पो. स्टे जुने शहर अकोला येथे गुन्हा क्रमांक १२४/२४ कलम ३७९ भा.दं. वि चा नोंद असून तपासावर आहे.
आरोपी अज्ञात असल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब अकोला श्री. बच्चन सिंह यांनी पो. नि शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांना सदर गुन्हा उघडकीस आणन्या बाबत सुचना दिल्या, त्या अनुषंगाने पो. नि श्री. शंकर शेळके यांनी एक पथक गठीत करून त्यांना वेळोवेळी गुन्हा उघडकीस आणण्या करीता योग्य मार्गदर्शन करून पथकाने तांत्रिक विश्लेषन तसचे गोपनिय माहीतीच्या आधारे अकोला शहरात बॅग लिफ्टर्टी करणारा आरोपीचा शोध तसेच माहीती घेतली असता सदर गुन्हा हा अट्टल गुन्हेगार नामे आकश उर्फ बंटी भवरसिंग राजपुत रा. विद्या नगर, झोपडपट्टी आयशा मस्जीद मागे चिंचवड पुणे याने त्याचे साथीदारासह केल्या बाबत माहीती प्राप्त झाली, वरून स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील पथकास आरोपी हा त्याचे राहते घरी असल्याबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली असता, पो. नि श्री. शंकर शेळके यांनी त्यांचे अधिनीस्त पथक पुणे येथे खाना केले. पथकाने आरोपीस त्याचे राहते घरून आरोपीस ताब्यात घेतले. वर नमुद आरोपीने अकोला शहरातील बॅग लिफ्टींग तसेच पोलीस स्टेशन रामदास पेठ, सिव्हील लाईन, आणि सिटी कोतवाली या ठिकाणी सुध्दा सिगारेट चोरीचे गुन्हे त्याचे ईतर ०२ साथीदारासह केल्याची कबुली दिली असून १) पो. स्टे रामदास पेठ अकोला येथे अप नं अप नं २७५/२०२३ कलम ३७९ भादंवि २) पो. स्टे सिव्हील लाईन येथे अप नं अप नं ३६७/२०२३ कलम ३७९ भादंवि ३) पो. स्टे सिटी कोतवाली येथे अप. नं अप नं १८८/२०२३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हे नोंद आहेत. अटक आरोपी पासून गुन्हयात वापरलेले वाहन तसेच नगदी असा एकुण २,४०,०००/-रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन जुने शहर यांचे ताब्यात देण्यात येत आहे.
सदर ची कार्यवाही ही सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि. श्री. विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, माजीद पठाण, पो. अमंलदार अब्दुल माजीद, वसीमोद्दीन शेख, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये अविनाश पाचपोर, भास्कर धोत्रे, अमोल दिपके, चाालक, अक्षय बोबडे यांनी केली आहे.