केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन चे जिल्हाधिकारी विभाग नियंत्रकाना निवेदन…
अकोला प्रतिनिधी: अकोला तालुक्यातील अकोला ते. उगवा,आगर एसटी बस सेवा ही गेल्या तीन महिन्यापासून बंद असून. त्यामुळे विद्यार्थी. शेतकरी बांधव नागरिकांना अपंग निराधार. यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे… एसटी बस सेवा तीन महिन्यापासून बंद असून आगर येथून विद्यार्थ्यांना अकोला येथे जाण्याकरिता. एसटी बस सेवा ही बंद असल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे… असे सांगण्यात येत आहे की.. मध्यस्थ असलेला , लेडी नाला चा पुल वाहून गेल्यामुळे, त्या ठिकाणाहून एसटी बस सेवा ही जाऊ शकत नाही… असे सांगण्यात येत आहे.. तरी अकोला ते उगवा आगर एसटी बस सेवा ही त्वरित बाजूला. नाल्याच्या पर्याय करून त्वरित एसटी बस सेवा ही सुरू करण्यात यावी…. अन्यथा केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन. च्या वतीने आंदोलन करण्यात येईल … असा इशारा संबंधितांना दिला आहे… अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अकोला,व अकोला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक यांना दिले आहे….यावेळी निवेदन देतेवेळी.. केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष कोलटके, जिल्हा अध्यक्ष रामरतन घावट, अकोला तालुका अध्यक्ष, आगर सरपंच सतिश शिरसाट,महिला जिल्हाध्यक्ष, मंगलाताई पुंडकर, उल्हास पुंडकर, व केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….