अकोला प्रतिनिधि: इरशाद अहमद
अकोला : हरवलेले तथा चोरी गेलेले मोबाईल ट्रेस करुन ते मोबाईल धारकांना परत मिळवून देता यावे या करीता CEIR (Central Equipment Identity Register) हे शासकीय ऑनलाईन पोर्टल विकसीत करण्यात आलेले आहे. मागिल सहा महीन्याच्या कालावधीत अकोला जिल्हयातील सायबर आणि पोलीस स्टेशन येथे नेमणूकीस असलेल्या पोलीस अमलदारांनी विशेष प्रयत्न करुन तांत्रिक तपासाच्या आधारावर अकोला शहर उपविभागातील हरवलेले एकून 91 मोबाईल (स्मार्ट फोन) राज्य तथा अन्य राज्यातून ट्रेस करुन ताब्यात घेतले आहेत. मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह आणि मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यापैकी 82 मोबाईल श्री सतीश कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी आणि पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शहर विभाग यांचे हस्ते मोबाईलधाराकांना परत करण्यात आले आहेत.
नागरीकांना आव्हान करण्यात येते की, त्यांनी जूने मोबाईल खरेदी करण्यापुर्वी त्याचे पक्के बिल आणि इतर कागदत्राबाबत खात्री करावी व आमीषाला बळी पडून कागदपत्राशिवाय स्वस्तात मिळणारे मोबाईल खरेदी करु नये. आपले मोबाईल गहाळ झाल्यास अथवा चोरी गेल्यास आपण htttps://www.ceir.gov.in या वेबसाईटद्वारे CEIR पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवावी.