महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागची काढली प्रेतयात्रा
अकोला शहराच्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, नागरिकांना दररोज प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही अकोला महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने अखेर अकोला काँग्रेस पक्षाने लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोट फाईल येथील उड्डाणपूल, जो इंग्रजांच्या काळात बांधण्यात आला होता, आजही उभा असला तरी त्यावरचा रस्ता मात्र चाळणी झाला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांसह, श्रावण महिन्यात कावड घेऊन जाणाऱ्या भक्तांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेविका चांदणी रवी शिंदे यांनी याबाबत वारंवार विनंती करूनही, महानगरपालिकेने केवळ ठिगळ लावण्याची थातूरमातूर कामे केली आहेत.
त्यामुळे रवी शिंदे महासचिव महानगर काँग्रेस कमिटी व जिल्हाध्यक्ष आरोग्य सेवा व सौ चांदणी रवी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकोला काँग्रेसने अकोला महानगरपालिकेची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. 2 सप्टेंबर 2024 रोजी होणारा ऐतिहासिक कावड व पालखी महोत्सव लक्षात घेता, या पुलावरील रस्त्याची त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आकोट फाईल पोलीस स्टेशन ते शेलार फाईल गुरुद्वारा पर्यंत काँग्रेस पक्षाने प्रेतयात्रा काढली.
या आंदोलनात काँग्रेसचे नेते डॉ. जीशान हुसेन, माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते मोहम्मद युसुफ या अंतिम यात्रेला काँग्रेसचे नेते मोहम्मद इरफान भाई नगरसेवक मोहीम खान उर्फ मुंटू दादा नगरसेवक शेख नव्हेद नगरसेवक विभा ताई राऊत नगरसेविका पुष्पाताई देशमुख शहर अध्यक्ष महिला Adv सोनल ताई विजय शेगावकर गणेश कळसकर पश्चिम ब्लॉक अध्यक्ष विलास गोतमारे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी विजय जामनिक युवा नेते शेख अजहर सोशल मीडिया अध्यक्ष विनोद मराठे युवा नेते महेंद्र सत्याल युवा नेते प्रवीण भाऊ उपरास प्रमोद तायडे सर रवी निकम जिम ट्रेनर शेख आबिद नूर खा मदार खा शेख जुबेर शेख ताहेर बजरंग बागडे उर्फ बंटी भाऊ छोटू भाऊ गवई विक्रम गायकवाड अनिल वाघमारे विजुभाऊ गायकवाड राकेश बिचकुंडे महादेव काका गायकवाड शेख भिकन शेख बिस्मिल्ला शेख इस्माईल शेख तलाह अजय घोडेस्वार वसीम भाई तार फाईल मोहम्मद नौशाद नगरसेवक सय्यद जाकीर युवा नेते रहमान बाबू बंटी भोंडे युवा कार्यकर्ते सकाराम बड राजू आमटे ननकू पहलवान शुक्लवारे शेख आबिद शेख जुबेर शेख ताहेर शेख इजराइल शेख तलाह आणि या अंतिम यात्रेत मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अकोल्यातील रस्त्यांच्या दुर्दशेला तोड नाही, परंतु या आंदोलनानंतर प्रशासन जागे होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.