प्रशासनाची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करणाऱ्यांची चौकशी करावी : माजी नगरसेवक मोहम्मद इरफान

अकोला: भारतीय जनता पार्टीचे अकोला महानगर अध्यक्ष तथा माजी महापौर श्री विजय अग्रवाल यांनी ३०-अकोला पश्चिम मतदार संघामध्ये मतदार यादीतून डुप्लिकेट नावे कमी करण्याबाबत दिनांक १३/०८/२०२४ रोजी व दिनांक १६/०८/२०२४ रोजी मा.जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे निवेदन सादर केलेले आहे. दिनांक १३/०८/२०२४ रोजी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी १४००० व दिनांक १६/०८/२०२४ रोजी दिलेल्या निवेदनात ३४४०० मतदारांचे नावे डुप्लिकेट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सदरील दिलेल्या आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणात तफावत असून ३०-अकोला पश्चिम मतदार संघामधील मतदार यादीबद्दल गैरसमज पसरवून शासनाची दिशाभूल करून शासनाचा पैसा व वेळ खर्चिक करण्याची बाब असल्याचे दिसून येते. त्यामुळे भाजपच्या निवेदनाची कुठलीही दखल न घेता हा केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पब्लिसिटी स्टंट असल्याने शासनाचा पैसा व वेळ खर्च करण्यात येवू नये, असे निवेदन अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मोहम्मद इरफान यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

श्री अग्रवाल यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार आपण बी.एल.ओ./पर्यवेक्षक यांना फिल्ड व्हेरीफाय करण्याचे निर्देश दिलेले आहे. वास्तविक सदरील यादीतील नावे एकाच व्यक्तीचे नसून वेगवेगळ्या व्यक्तींचे आहेत. परंतु आपले कार्यालयाकडून संगणकात केवळ फिल्टर वापरून सदरचे नावे डुप्लिकेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे सदरील यादीतील नावे आपले स्तरावरून परस्पर वगळल्यास सदरील मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यांचे नाव व्हेरीफाय करण्यासाठी त्यांचे मतदानकार्डला आधारकार्ड जोडण्याची कार्यवाही केल्यानंतरच उचित निर्णय घ्यावा. जेणेकरून आपल्याला योग्य मतदारांचा आकडा माहिती होवून श्री अग्रवाल यांनी केलेल्या खोट्या तक्रारीबाबत शाहनिशा होईल. असेही निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक काही दिवसांवर येवून ठेवली असून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आपले स्तरावरून योग्य निर्णय होणे अपेक्षित आहे. काही पक्षांकडून शासनाची दिशाभूल करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे श्री अग्रवाल यांनी दिलेल्या खोट्या निवेदनाचा विचार न करता खऱ्या मतदारांचा योग्य सन्मान करण्यात यावा. अशी मागणी मोहम्मद इरफान यांनी केली.

सदरचे निवेदन देते वेळी माजी नगरसेवक मोहम्मद इरफान यांचे समवेत काँग्रेसचे वरिष्ठ नेता मोहम्मद युसुफ, सेवा दलचे अध्यक्ष तश्वर पटेल, आरोग्य सेलचे जिल्हाध्यक्ष रवी शिंदे, समाजसेवक मोईन खान उर्फ मोंटू, प्रशांत प्रधान, सय्यद शहजाद, मंजूर अहेमद, फिरोज गवळी, पंकज इंगळे, आसिफ खान, पंकज वाढवे, सैय्यद यासीन, सरदार सर, राजू नाईक, सोशल मिडिया अध्यक्ष अब्दुल मोईन उर्फ सोनू, आदि उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW