चौहट्टा बाजार: इस्लाम धर्माचे संस्थापक पैगम्बर मोहम्मद स.अ.स. यांच्या बद्दल अपमान कारक वक्तव्य करून मुस्लीम धर्माच्या भावना दुखावून दोन समाजात तेळ निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणे बाबत चोहौटा बाजार मुस्लिम समाज च्या वतीने निवेदन देण्यात आला निवेदन मध्ये स्पष्ट करण्यात आला की इस्लाम धर्माचे संस्थापक व पेषित मोहम्मद पैगंबर स.अ.स. यांच्या बददल १६/०८/२०२४ रोजी रामगिरी गुरु नारायणगीरी महाराज या व्यक्तीने मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे एक धार्मिक (पारायन) कार्यक्रमात त्यांनी स्वतः प्रवचना दरम्यान इस्लाम धर्माचे संस्थापक व पैगंबर मोहम्मद स.अ.स. यांनी वयाच्या ५०व्या वर्षी ६ वर्षाच्या मुलीशी लग्न केले हा किती अत्याचार आहे. मुळात ज्यांचे संस्कार अत्याचारी असल्यामुळे त्यांचे अनुयाई सुध्या तसे अत्याचारी मानसिकतेचे असतील. मुळात इस्लाम धर्माची शिकवणच ही अत्याचाराची असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले. तसेच या अत्याचारी विचारां मुळेच करोडो मुस्लीमांनी इस्लाम धर्म सोडला आहे व ज्यामध्ये इस्लाम धर्माचे मोठ मोठे मौलाना यांनी सुध्दा इस्लाम धर्माचा सुक्ष्म अभ्यास करान इस्लाम
मुस्लिम समाजच्या वतीने दहिंहांडा पोलीस निरक्षक यांना निवेदन.
धर्मा बाबत व इस्लाम धर्माचे संस्थापक व मोहम्मद पैगंबर स.अ.स. तथ्यहीन व कोणताही आधार नसलेले असे बदनामी कारक वक्तव्य करून दोन समाजा मध्ये तेड निर्माण करून जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला म्हणून अशा समाज कंटक असलेल्या नारायण गिरी महाराज यांच्या विरोधात व हा कार्यक्रमाचे आयोजक व सयोजकावर कायदेशीर कार्यवाही करुन गुन्हा नोंद करण्यात यावे. निवेदन देताना मुस्लिम समाजच्य लोकांनी नारायणगिरी महाराजवर आक्रोश व नाराजगी व्यक्त केली.