अकोला, दि. 15 : स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात स्वातंत्र्यसैनिक, शहिद सैनिक यांचे कुटुंबिय, उत्कृष्ट अधिकारी व विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या व्यक्तींचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. सीईओ बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त सुनील लहाने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिका-यांनी यावेळी विविध मान्यवर, अधिका-यांना भेटून संवाद साधला व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शहिद सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार झाला. यावेळी सुरेश शालिग्राम दांगट, निर्मला उदेभान तेलगोटे, ताराबाई महादेव तायडे, प्रभावती हरिश्चंद्र वानखडे, वीरमाता निर्मलादेवी जामनिक,ताईबाई राऊत,विरपिता शत्रुघ्न गवई यांच्यासह शहीद प्रवीण जंजाळ यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरीसाठी उपजिल्हाधिकारी शरद जावळे, मूर्तिजापूर तहसीलदार शिल्पा बोबडे, नायब तहसीलदार अतुल सोनवणे, लघुलेखक दिलीप ढोले, अव्वल कारकून संतोष कानडे, महसूल सहायक सावित्री नितनवरे, मंडळ अधिकारी प्रफुल्ल काळे, शिपाई सुरेश ठोकळ, वाहनचालक किशोर तायडे, कोतवाल दीपाली शेगोकार, पोलीस पाटील भारत तायडे आदींचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील शुभ पटेल, आर्या राठी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मतदार जनजागृतीसाठी योगदानाबद्दल प्रा. विशाल कोरडे, राहिल सिद्दीकी, पलक झांबरे. दिव्या चव्हाण. पल्लवी डोंगरे. गौरव मिरझामले. दीक्षांत बागडे, विशाल धुरिया, रस्ता सुरक्षा अभियानासाठी समृध्दी तायडे, अनुष्का खिलारे, श्रेया डोंगरे, दीपिका गोरखा, आयुष नखवाल, आदिल पठाण, हरिओम साठे आदींना गौरविण्यात आले.