डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष माननीय रमेश तायडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी माननीय उल्हास मोहोळ साहेब हे होते, यावेळी विचार मंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रा.मुकुंदजी भारसाखळे सर व सचिव मा.अशोक इंगळे सर,प्रमुख पाहुणे म्हणून बरोरा एज्युकेशन असोसिएशनचे आजीवन सदस्य माननीय योगेश अग्रवाल सर व या दिवसाच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती मा. रमेश तायडे सर , तसेच सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक माननीय पी.टी इंगले सर. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश बोरकर सर व तसेच सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक चे व्यवस्थापक माननीय तुषार खंडेराव सर विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. व तसेच 300 वृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्याकरिता सुरुवात करण्यात आली.
यानंतर विचार मंचावर उपस्थित ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा. मुकुंजी भारसाखळे सर व विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी माननीय रमेश तायडे सर यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला.
माननीय रमेश तायडे सर यांचे कौतुक करताना ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाखळे सर म्हणाले की वाढदिवस कोणाचीही साजरे होत नसतात वाढदिवस साजरा करण्यासाठी तेवढा त्याग व्यक्तीमध्ये असायला हवा आणि तो त्याग ते दातृत्व तायडे सरांमध्ये आहे आणि म्हणूनच आज एवढ मोठप्रतिष्ठान जे उभ आहे त्या प्रतिष्ठानचा एक खांब म्हणजे सन्माननीय रमेश तायडे सर आहेत.
यावेळी विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले व सरांसोबत असताना त्यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापिका सौ कोमल चिमणकर मॅडम यांनी केले.