याच टँकरचा काही दिवसापूर्वी झाला होता अपघात
कुरणखेड -राष्ट्रीय राज्य महामार्गावर काही दिवसा अगोदर नवीन वस्ती जवळ डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला होता त्यामध्ये मोठी जीवित हानी टळली होती या अपघात मधील अपघातग्रस्त टॅंकर कुरणखेड येथील टोलनाक्यावर नेऊन ठेवला होता तिथे आज या टँकरने पेट घेतला होता त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे
बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक ५३ वरील कुरणखेड नवीन वस्ती जवळ ता.4 ऑगस्ट रोजी अकोल्यावरून मुर्तीजापुरच्या दिशेने जाणाऱ्या टँकर क्रमांक जी.जे.१२ बीझेड८५२०या टँकरचा अपघात झाला होता त्यामध्ये महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अपघातानंतर वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने या टँकरला रस्त्याच्या बाजूला करण्यात आले होते अपघात नंतर टँकर हा कुरणखेड येथील टोल नाक्यावर ठेवण्यात आला होता मात्र आज दुपारच्या सुमारास टँकर मधील डिझेल बाहेर काढत असतांना अचानक या टँकरने पेट घेतल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात जीवित हानी निर्माण झाली होती घटनास्थळी नागरिकांचे जीव धोक्यात आले होते घटनेची माहिती मिळतात स्थानिक नागरिक तथा विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव संपर्क प्रमुख योगेश विजयकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय माल्टे, शाहाबाज शाहा, सैय्यद माजीद, मंगेश पावडे, मोहन वाघमारे, यांनी घटनास्थळी दाखल होत पेट घेतलेला टँकर विजवण्यासाठी मदत केली यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला आहे घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे, सतिष सपकाळ, संदिप पवार, सचिन सोनटक्के, सुदीप राऊत, गिरीश वीर घटनास्थळी उपस्थित होते।