आरक्षण बचाव रॅलीचे अकोला जिल्ह्यात विविध समूहाकडून जंगी स्वागत
संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ओबीसी एससी एसटी आरक्षण बचाव रॅली अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातील लागपुरी या गावांमध्ये दिनांक पाच ऑगस्ट 2024 ला सकाळी 11 वाजता येणार असून ही रॅली मुर्तीजापुर त्यानंतर अकोला व पातुर जात असून अकोला टावर चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालया समोर दुपारी तीन वाजता बाळासाहेब आंबेडकर रॅलीला संबोधित करणार अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी दिली यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले संपूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या समूहातून या आरक्षण बचाव यात्रा चे स्वागत अकोला जिल्ह्यात होणार असून जास्तीत जास्त संख्येने या रॅली ओबीसी एससी एसटी मंडळींनी उपस्थित रहावे यावेळी शहराध्यक्ष मजहर खान शहर महासचिव गजानन गवई तालुका अध्यक्ष किशोर जामणीक एडवोकेट बेलसरे दिनकर खंडारे मनोहर शेळके शरद इंगोले नितीन सपकाळ पराग गवई गोपाल ढोरे वसंतराव नागे प्रदीप पळसपगार सुशील मोहोळ प्रभाकर अवचार संदीप शिरसाट मिलिंद मोहोळ संजय कीर्तक सतीश चोपडे संतोष कीर्तन निलेश सोनाग्रे भीमराव पळसपकार सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।