राज्यव्यापी अधिवेशन बाबत चर्चा
समुद्रपूर तालुका समितीचे गठन करण्यासाठी सदर कार्यक्रम ग्रामपंचायत भवन गिरड येथे दि. 28/07/24 सायंकाळी सहा वाजता करण्यात आयोजन आले. त्याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सचिन वैद्य, उपाध्यक्ष आर्यन कांबळे व वर्धा तालुका प्रमुख तुषार रेड्डीवार व उपाध्यक्ष अमोल ठाकरे यांच्या उपस्थितीत पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारे तसेच समाजातील वंचित घटकांना अविरत मदतीसाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ समुद्रपूर तालुक्यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करून नियुक्ती देण्यात आली.
त्यामध्ये तालुकाप्रमुख मनवर सुभान शेख, सचिव सुरेश भगत, प्रसिद्धी प्रमुख दिलीप झाडे, कार्याध्यक्ष रुपेश पिंजरकर, विठ्ठल पिंजरकर, गुड्डू भाई, युसुफ पठाण, येफाज पठाण, वर्धा शहर कोषाध्यक्ष अब्दुल कादिर इत्यादींना नियुक्तीपत्र देऊन पुढील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तर या कार्यक्रमाचे संचालन दिलीप झाडे व प्रास्ताविक मनवर शेख तसेच सदर कार्यक्रमाची सांगता आभार कदिर मामु यांनी केली त्याचप्रमाणे इतर नागरिकांनी सहभागी सहकार्य केले.