अकोला प्रतिनिधि: समीर खान
विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमिर भाई शेख यांच्या आदेशानुसार युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अभिजीत तवर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीवर बंदी असतांना सर्वत्र राजरोसपणे कुठल्याही भितीशिवाय पथ विक्रेते गुटखा विक्री करीत आहेत.
अकोला शहरात प्रामुख्याने रुग्णालय, शाळा-महाविद्यालय, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठ अशा वर्दळीच्या ठिकाणी सर्रासपणे गटखा विक्री होत आहे. गुटख्यामुळे सर्वसामान्य जनतेला कॅन्सर, पाचन समस्या इत्यादी दुर्धर आजारांना सामोरे जावे लागते. गुटख्यामुळे कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे व शाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर त्याचा विपरित परिणाम होत असून परिणामी त्यांच्या कुटूंबावर फार मोठी आर्थिक संकटे ओढावलेली आहेत.
राज्य सरकारच्या मदतीमुळेच आपल्या राज्यात गुजरात येथून बेकायदेशिरपणे मोठ्या प्रमाणात गुटखा येत असून, राजरोसपणे गुटखा विक्री राज्यात सुरू आहे. तरी आपणास या निवेदनाव्दारे कळविण्यत येते की, वरील ठिकाणी सुरू असलेली गुटखा विक्री विरूध्द कठोण निर्यण घेवून गुटखा खरेदी करणारा आणि विक्री करणारा अशा दोघांवर कायदेशीर कारवाई करून जिल्ह्यात होत असलेली अवैध गुटखा विक्री बंद करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले अन्यथा अकोला जिल्हा एन.एस.यु.आय. तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी युवा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवान, पूर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश पाटील,पश्चिम विधानसभा अध्यक्ष मोहम्मद शरीक, लखन सारवान विद्यार्थी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष सारंग शिंदे, जिल्हा महासचिव ऋषिकेश जामोदे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष तेजस देवबाले, सोहम गवई, जिल्हा सचिव हर्ष ढोरे, युवा काँग्रेसचे स्वप्निल पाठक, आधी कार्यकर्ते उपस्थित होते