नागरिक सुरक्षेच्या दृष्टिीने घ्यावयाची दक्षता अकोट येथील बस स्थानक येथे “मॉक ड्रिल” चे आयोजन

दहशतवाद विरोधी शाखा, अकोला कडून दहशतवादी हल्ला झाल्यास प्रतिउत्तराकरिता करावयाची कारवाई नागरिक सुरक्षेच्या दृष्टिीने घ्यावयाची दक्षता अकोट येथील बस स्थानक येथे “मॉक ड्रिल” चे आयोजन

अकोला जिल्यातील नागरिकांनी सर्तक राहावे तसेच अकोला जिल्हयात कोणत्याही ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्या हल्यास प्रतिउत्तर कसे दयावयाचे व नागरिकांना सदर हल्यातून सुरक्षीत कसे बाहेर काढावयाचे व नागरिकांना सुरक्षीतता कशी प्रदान करता येईल त्याच प्रमाणे दहशतवादी कृत्याच्या घटनाबाबत जनमानसात जनजगृती निर्माण व्हावी या करिता मा. श्री. बच्चन सिंह पोलीस अधिक्षक, मा. अभय डोंगरे अपर पोलीस अधिक्षक, मा. श्री अनमोल मित्तल उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, पो. नि. अमोल माळवे पो.स्टे. अकोट शहर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच दहशतवाद विरोधी शाखा अकोला प्रभारी अधिकारी पोउपनि. श्री संतोष तिवारी व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार व बॉम्ब शोधक व नाशक पथक, अकोला, पोलीस मुख्यालय अकोला येथील आर. सी. पी. व क्यु. आर. टि. पथक, स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे समन्वयाने दिनांक ३१/०७/२०२४ रोजी १६:५३ पासून ते १८:४५ पावेतो ‘पो. स्टे. अकोट शहर येथील बस स्थानक येथे २ दहशतवादी त्यांचे मागणी करीता नियंत्रण कक्ष, येथील लोकांना ओलीस धरले असा बनाव करून मॉकड्रिल (सराव अभ्यास) चे आयोजन करण्यात आले.

सदर सरावामध्ये क्यु. आर. टि. पथकाकडून कारवाई करून त्यामध्ये १ दहशतवादी ठार आणि १ दहशतवादी जखमी तसेच न्युट्रलाईज करून त्यांनी ओलीस धरलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचा तसेच दहशवादयाकडे असलेल्या स्फोटकांची बि.डि. डि.एस. पथका जवळील उपकरण तसेच श्वान रॅम्बो यांचे माध्यमातून तपासणी करून सदर नियंत्रण कक्ष मध्ये मिळून आलेल्या एका जखमी दहशतवादयास आर.सि.पी. चे कमांन्डोज चे माध्यमातून ताब्यात घेवून व नंतर पूढील कारवाई कामी त्यास स्थानिक पोलीसांया ताब्यात देण्याचा सदर सराव अभ्यास प्रभावीरित्या पार पाडण्यात आला. सदर सरावामध्ये अकोला जिल्यातील एकूण १० अधिकारी तसेच १०४ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.

सदर मॉकड्रिल यशस्वीरित्या व प्रभावी रित्या पार पाडण्याकरिता मा. श्री. बच्चन सिंह पोलीस अधिक्षक, अकोला, मा. अभय डोंगरे अपर पोलीस अधिक्षक, मा. श्री अनमोल मित्तल उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, यांनी विशेष मार्गदर्शन केले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW