अकोला प्रतिनिधि: इरशाद अहमद

रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथील गु.र.नं.३५/२०१२ भा.द.वि.कलम ३९२ या जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपी पिराजी शेट्टीबा मेटकर, रा. चिखलपुरा, नांदेड याला नमुद गुन्हयामध्ये मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो, कोर्ट नं.५, अकोला यांनी दि.१८/०५/२०१३ रोजी ३ वर्षे सश्रम कारावास व १०००/- रूपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मा. न्यायालयाने निकाल देण्यापुर्वीच नमुद आरोपी हा फरार झालेला होता. त्याचा वेळोवेळी शोध घेत असताना तो हैदराबाद येथे लपून बसल्याने मिळून येत नव्हता.
दि.२९/०७/२०२४ रोजी रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे ASI/ असलम पठाण व HC/संतोष वडगीरे यांना नमुद फरार आरोपीचा शोध घेण्याकरीता नांदेड येथे रवाना करण्यात आले. पोलीसांनी सदर फरार आरोपीचा त्याच्या राहत्या गावी शोध घेवून त्याला शिताफीने अटक केलेली आहे. आरोपीला मा. न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा कारागृह, अकोला येथे जमा करण्यात आले आहे. मा. न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्याने मागील ११ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात अकोला रेल्वे पोलीसांना मोठे यश प्राप्त झालेले आहे.
मा. पोलीस अधिक्षक डॉ. श्री अक्षय शिंदे साो, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष वाळके साो यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी API अर्चना गाढवे, API पंकज ढोके, ASI/ असलम पठाण, HC/संतोष वडगीरे, HC/ सुरेश बाबर, यांनी सदरची कारवाई केली आहे.