अकोला प्रतिनिधि: इरशाद अहमद

माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय श्रीमती जयश्री दुतोंडे मॅडम यांच्या आदेशान्वये तथा मार्गदर्शनाखाली दिनांक 29 .7. 2024 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पथक क्रमांक एक व शहर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक यांच्यामार्फत संयुक्त ड्रंक अँड ड्राईव्ह, वाहनांचे कागदपत्रे तपासणी मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये 14 खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स बसेस ची तपासणी करण्यात येऊन एक दोषी आढळून आलेली बस अटकावून ठेवण्यात येऊन त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री मनोज शेळके शहर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक श्री जयवंत शिंदे व वाहन चालक श्री हेमंत सोनटक्के इत्यादी सहभागी होते.
