१०० आणि ४०० मिटर स्पर्धा बैंगलोर येथे संपन्न
अकोला. १३ वी सब ज्युनिअर पॅरा नॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धा कर्नाटक राज्यात बैंगलोर येथे १५ ते १७ जुलै या काळात १०० मिटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. या स्पर्धेत देशाभरातील ७५० स्पर्धाकांनी सहभाग नोंदविला होता.यामध्ये दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उडीसा, तामिळनाडू व गुजरात सह इतर राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. अकोल्यातील उमरी भागात रहिवाशी असलेल्या ऍटो चालक विजय पाठक ह्यांचा ४० टक्के दृष्टीदोष असलेला मुलगा चैतन्य या स्पर्धकाने अंडर १९ मध्ये आणि अंडर १७ टी १३ महाराष्ट्र या गटात खेळला असून त्याने १०० आणि ४०० मीटर या दोन्ही स्पर्धेत २ सुवर्ण पदके मिळवली आहेत.
चैतन्य विजय पाठक याला जिल्हा क्रीडा अधिकारी सतिषचंद्र भट, कोच – रवी भटकर , स्वप्निल गावंडे , अरबाज खान, ताबिश अफजल खान,सुनील वानखडे, अभिषेक मिश्रा, , यांचे सुरुवातपासून मार्गदर्शन लाभले. चैतन्यला शालेय क्रीडा स्पर्धासाठी मुख्याध्यापिका मायाताई डेहनकर, क्रीडा शिक्षक माधव ढेपे यांनी चैतन्य ला आर्थिक मदत देऊन तर पॅराऑलम्पिक स्पर्धा २०२४ साठी भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय घोगरे यांनी तर बैंगलोर स्पर्धेसाठी महाराष्ट्र टीमचे प्रशिक्षक राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केल्याने आणि वसंत देसाई स्टेडियमला पोलीस भरती सुरू असल्या कारणाने व शास्त्री स्टेडियमला जास्त गर्दी होत असल्यामुळे प्रॅक्टिस करायला त्रास होत होता अशावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ग्राउंडला प्रॅक्टिस करण्याकरिता अधिकारी हाडोळे यांनी प्रॅक्टिस करण्याची परवानगी